Join us  

काय सांगता! रिया चक्रवर्तीला तुरुंगात करावा लागला होता 'नागीन डान्स'; अभिनेत्रीने सांगितलं कारागृहातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 4:18 PM

Rhea chakraborty: रियाने पहिल्यांदाच तुरुंगातील जीवन कसं असं यावर प्रकाश टाकला आहे.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या आत्महत्येनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे रिया चक्रवर्ती (rhea chakraborty).  सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात रिया चांगलीच अडकली होती. परिणामी, तिला तुरुंगातही जावं लागलं. अलिकडेच रियाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने २०२० मध्ये तिला कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला. तुरुंगात तिला कशाप्रकारची वागणूक मिळाली. कसा त्रास झाला हे तिने सांगितलं.

सुशांतने २०२० मध्ये वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर संशयाची सुई रियाच्या दिशेने वळली. परिणामी, तिला एनसीबी, ईडी या सगळ्याचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर तिच्या कुटुंबियांवरही गंभीर आरोप करण्यात आले. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रियाला मुख्य आरोपी म्हणून समजण्यात येत होतं. रियाने अलिकडेच चेतन भगतच्या 'डीपटॉक विद चेतन भगत'ला मुलाखत दिली. 

या मुलाखतीमध्ये तिने तुरुंगात कशा प्रकारे हाल सहन करावे लागले हे सांगितलं. "तो काळ कोरोनाचा होता. त्यामुळे मला प्रोटोकॉलनुसार, १४ दिवस तुरुंगातील एका वेगळ्या रुममध्ये ठेवलं होतं. त्या रुममध्ये मी एकटीच होते. मी त्यावेळी इतकी दमले होते की, त्यांनी मला जे जेवण दिलं ते मी खाल्लं. त्यांनी मला चपाती आणि शिमला मिर्चीची भाजी दिली होती. पण भाजी म्हणजे, शिमला मिर्ची पाण्यात तरंगत होत्या. पण, त्यावेळी भूकेमुळे मला या कोणत्या गोष्टीचा फरक पडला नाही", असं रिया म्हणाली.पुढे ती सांगते,  "या तुरुंगात एक कॅन्टिन आहे जेथे तुम्ही बिस्किट विकत घेऊ शकता. कधी-कधी चने सुद्धा मिळतात. घरातून तुम्हाला ५ हजार ची मनी ऑर्डर मिळते.या ५ हजारात तुम्हाला महिना काढायचा असतो."

तुरुंगातील शौचालयांचं भयान वास्तव

रियाने तुरुंगातील टॉयलेटची परिस्थिती कशी असते हे सुद्धा सांगितलं. "तुम्ही जिथे झोपता त्याच्याच बाजूला टॉयलेट असतात. हे काही बेस्ट टॉयलेट नसतात. त्यांची परिस्थिती फार वाईट असते. तुरुंगात राहणं सगळ्यात कठीण असतं. मेंटल ट्रॉमा खूप जास्त त्रासदायक असतो . त्याच्यापुढे फिजिकल ट्रॉम सुद्धा कमी पडतो." 

तुरुंगात कस होतं रियाचं डेली रुटीन

"तुरुंगात सकाळी ६ वाजता नाश्ता, ११ वाजता दुपारचं जेवण, २ वाजता रात्रीचं जेवण देण्यात येतं. सकाळी ५ वाजता कैद्यांच्या बराकचे दरवाचे उघडले जातात आणि संध्याकाळी ५ वाजता ते बंद होतात. तिथले काही लोक दुपारी २ वाजता मिळणारं जेवण राखून ठेवायचे आणि ७-८ वाजता जेवायचे. माझी दिनचर्या सगळीच बदलली होती. मला तसंही ते थंड जेवण जात नव्हतं. त्यामुळे मी सकाळी ४ वाजता उठायचे आणि दुपारी २ वाजता मिळणारं जेवण तेव्हाच करायचे."

रियाला करावा लागला तुरुंगात डान्स

दरम्यान, तुरुंगात रियाला इतर महिला कैद्यांनी नागीन डान्सही करुन दाखवायला सांगितला होता. मी अभिनेत्री असल्यामुळे तेथील इतर महिला कैद्यांनी मला नागीन डान्स करायला सांगितला होता. मी सुद्धा त्यांच्यासाठी जमिनीवर झोपून तो डान्स केला होता, असंही रियाने यावेळी सांगितलं.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतबॉलिवूडसेलिब्रिटीनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो