Join us  

महेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करून फसली रिया चक्रवर्ती! नेटकऱ्यांनी केली अनूप-जसलीनसोबत तुलना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:25 PM

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने महेश भट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महेश भट्ट यांच्यासोबतचा एक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला.

बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी काल (२० सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा केला. ७० व्या वाढदिवसानिमित्त महेश भट्ट शुभेच्छांचा वर्षाव झाला. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेही महेश भट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, यानिमित्त महेश भट्ट यांच्यासोबतचा एक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला.

 ‘मेरे बुद्धा को जन्मदिन की बधाई, सर ये हम है. आप ने मुझे प्यार से थामा. आपने मेरे साथ प्यार जताया़ आमने मुझे हमेशा आजाद होकर उडना सिखाया. आप एक ऐसा प्रकाश है, जो आपके संपर्क में आने वाले हर एक शख्स को रोशन कर देता है,’, असा एक भावूक संदेश तिने या फोटोसोबत लिहिला. पण हा फोटो शेअर केला आणि रिया ट्रोल झाली. अनेकांनी तिची तुलना थेट ‘बिग बॉस 12’ची स्पर्धक जोडी अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्यासोबत केली. सध्या या जोडीची देशभर चर्चा आहे. ‘बिग बॉस 12’तील सर्वाधिक कॉन्ट्रोवर्सिअल जोडी असा या जोडीचा उल्लेख केला जात आहे. याला कारण म्हणजे, आम्ही गत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे, असा खुलासा अनूप व जसलीनने केला आहे. दोघांच्याही वयात ३७ वर्षांचा फरक असल्यामुळे या जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या रिलेशनशिपमुळे अनूप व जसलीनची खिल्लीही उडवली जातेय.

 महेश भट्ट आणि रिया चक्रवतीचा फोटो पाहून चाहत्यांनी त्यांची तुलनाही अनूप व जसलीन यांच्या फोटोशी केली आहे. रियाने शेअर केलेल्या फोटोत महेश यांनी तिच्या खांद्यावर डोके ठेवलेले आहे. हा फोटो पाहिला आणि नेटीजन्सनी रियाला ट्रोल करणे सुरू केले. ‘बिग बॉस का असर सारे देश में देखने को मिल राहा है,’ असे एका युजर लिहिले.

 एकाने तर थेट, ‘इट्स अफेअर’ म्हणून रिया व महेशच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘जवान लडके खतम हो गये क्या?’ असा सवाल करत एका युजरने रियाची खिल्ली उडवली.

तुम्ही डेट करत आहात का? असा प्रश्न एकाने केला. एकंदर काय तर अनूप जलोटा व जसलीननंतर महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीची चर्चा रंगलीय.

टॅग्स :महेश भटरिया चक्रवर्तीअनुप जलोटाजसलीन मथारूबिग बॉस 12