Join us  

कुणी काम देता का काम..! असं म्हणण्याची वेळ आलीय अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर, आता या ठिकाणी वळवला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 2:18 PM

सध्या रिया चक्रवर्तीला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे ती इतर राज्यात काम शोधते आहे.

फारशी कुणाला माहित नसलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अचानक चर्चेत आली. तिच्यावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर रियाला अनेक वादांना तोंड द्यावे लागले. इतकेच नाही ड्रग्स कनेक्शन प्रकरणी तिला तुरूंगाची हवादेखील खावी लागली.  सध्या रिया जामीनावर सुटली आहे. ती पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते आहे. सध्या तिला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे रिया हैदराबादमध्ये कामाच्या शोधात आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया लवकरच एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. पण, रियाने अद्याप या बातमीला दुजोरा दिला नाही. त्याचबरोबर सूत्रांचे म्हणणे आहे की, रियासाठी हे सोपे काम नाही. मात्र, पुढे जाण्यासाठी आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी तिला हे करण्याची आवश्यकता आहे.

रिया हळूहळू तिच्या पूर्ववत आयुष्यात परतत आहे. नुकतीच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिच्या हातात हनुमान चालीसा पहायला मिळाली. हा फोटो शेअर करताना रियाने लिहिले की, आम्हाला या वादळाशी लढण्याची शक्ती द्या, या दु: खाचा सामना करण्याची शक्ती द्या. जय बजरंगबली.

यापूर्वी रियाने स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती पुस्तक वाचताना दिसत आहे. या फोटोसोबत विश्वास ढळू देऊ नका, असे लिहले आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीला घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. या प्रकरणानंतर रियाला सध्या बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचेही वृत्त आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिया चक्रवर्ती लवकरच ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु देशात वाढत्या कोरोना प्रकरणामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.

या चित्रपटात रियाबरोबर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच ‘चेहरे’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतचेहरेअमिताभ बच्चनइमरान हाश्मी