Join us  

सुशांत सिंह राजपूतच्या फॅमिलीवर लीगल अ‍ॅक्शन घेऊ शकते रिया चक्रवर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 2:20 PM

आता रिया चक्रवर्तीचे वकिल सतीश मानेशिंदे म्हणाले की, ते सुप्रीम कोर्टात खोटं बोलल्याबाबत सुशांतच्या फॅमिलीवर लीगल अ‍ॅक्शन घेतील.

सुशांत सिंह राजपूत केसचा तपास सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर सीबीआय करत आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सुशांतच्या फॅमिलीने रियावर अनेक आरोप लावले होते. आता रिया चक्रवर्तीचे वकिल सतीश मानेशिंदे म्हणाले की, ते सुप्रीम कोर्टात खोटं बोलल्याबाबत सुशांतच्या फॅमिलीवर लीगल अ‍ॅक्शन घेतील. मानेशिंदे यांनी सुशांतच्या फॅमिलीकडून रियावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

मानेशिंदे म्हणाले की, 'सुशांत सिंह राजपूतच्या दोन बहिणींचे चॅट्स आणि त्यांनी पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनमधून हे स्पष्ट होतं की, सुशांतच्या फॅमिलीला त्याच्या मानसिक स्थितीबाबत पूर्णपणे माहिती होती. ते लोक प्रिस्क्रिप्शन पाठवत होते. पण कोर्टाला, ईडीला त्यांना खोटं सांगितलं. 

ते म्हणाले की, 'डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय, सल्ल्याशिवाय औषध देणंही बेकायदेशीर आहे. इतकेच नाही तर ऑनलाइन जरी कंसल्ट केलं असेल तरी आधी डॉक्टरला रूग्णाची पूर्ण हिस्ट्री माहीत असली पाहिजे. आता रिया चक्रवर्ती सुशांतच्या फॅमिली विरोधात केस दाखल करण्यासोबत लीगल अ‍ॅक्शनचा विचार करत आहे'.

गेल्या दोन-तीन दिवसामध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे काही स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत. यातील एक चॅट सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुति मोदी आणि त्याची मोठी बहीण नीतू सिंह यांच्यातील आहे. ज्यात नीतूने श्रुतिकडून सुशांतच्या औषधांचं प्रिस्क्रीप्शन मागितलं होतं. सुशांत आणि त्याची बहीण प्रियंका यांच्यातीलही एक चॅट समोर आलं आहे. ज्यात तिने सुशांतला दिल्लीच्या एका डॉक्टरचं प्रिस्क्रीप्शन पाठवलं होतं आणि यातून हे स्पष्ट होतं की, तो डिप्रेशनची औषधं घेत होता. 

सुशांतच्या बहिणीने दिली औषधं

8 जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी उपस्थित असताना अभिनेता सुशांत आपली बहीण प्रियंकाशी मेसेंजरवर बोलत होता, अशी माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिली आहे. सकाळी दहाच्या सुमारास सुशांत बहीण प्रियंकाशी बोलत होता. यादरम्यान प्रियंकाने सुशांतला 1 आठवड्यासाठी Librium capsule घेण्यास सांगितले. मग न्याहारीनंतर nexito 10mg दररोज खाण्यास सांगितले गेले. ही सर्व संभाषणे मेसेंजर अ‍ॅपवर झाली.

सूत्रानुसार प्रियंकाने आपल्या भावाला SOSसाठी Lonazep tablet स्वतःजवळ ठेवण्यास सांगितले होते. जेणेकरून एंजाइटी अटॅक आल्यास सुशांत त्या औषधाचा वापर करू शकेल. सुशांतने प्रियांकाला सांगितले होते की, ही औषधे खरेदी करण्यासाठी तिला प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागते. त्यानंतर प्रियांकाने प्रिस्क्रिप्शनची व्यवस्था केली होती. या चॅटमुळे डॉक्टरांना न दाखवता आणि त्यांची प्रकृती पाहिल्याशिवाय सुशांतला मेडिकेशन कसे देण्यात आले आहे याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सूत्रांनी इंडिया टुडेला याची माहिती दिली आहे की, डॉ. तरुण कुमार सुशांतचे कौटुंबिक मित्र होते. या डॉक्टरांनी ही औषधे दिली होती. यासाठी सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेण्यात आला होता.

प्रियंकाने सुशांतला मेसेज पाठवून सांगितले की, तिची मैत्रीण सुप्रसिद्ध डॉक्टर आहे आणि ती अभिनेताला मुंबईच्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांशी ओळख करून देईल. त्यानंतर प्रियंकाने प्रिस्क्रिप्शन शेअर करुन सुशांतला त्याविषयी माहिती दिली. प्रियंकाने सुशांतला दिलेली Librium , Nexito 10 mg आणि Lonazep औषधे अशी होती.

हे पण वाचा :

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

रियाने सुशांतचे घर सोडण्याचं नवं कारण आलं समोर, वकिलांचा सुशांतच्या बहिणीवर आरोप

सीबीआयची सुशांतच्या बहिणीकडे चौकशी, 8 ते 13 जूनपर्यंतचा जाणून घेतला घटनाक्रम

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत