Join us  

​करिनाच्या प्रेग्नेंसीबाबत वडील रणधीर कपूर यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 9:06 PM

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच आई होणार आहे. करिना व सैफच्या बाळाची पतौडी कुटुंबियांसह कपूर खानदानमध्येही तेवढीच उत्सुकता आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच आई होणार आहे. करिना व सैफच्या बाळाची पतौडी कुटुंबियांसह कपूर खानदानमध्येही तेवढीच उत्सुकता आहे. करिना आपल्या बाळाला कधी जन्म देणार याची माहिती करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी दिली आहे. प्रग्नेंसीनंतरही तिचा बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णयाचे समर्थन केले आहे. करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये करिनाच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही सर्व करिनाच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी आतूर आहोत. करिनाचे आरोग्य चांगले आहे व बाळाचीही वाढदेखील चांगली होत आहे. डॉक्टरांनी तिला २० डिसेंबर ही तारीख दिली आहे. मात्र, तिची डिलेव्हरी नॉर्मल होणार की नाही हे आताच सांगता येत नाही. करिनाची प्रकृती व  बाळाची स्थिती पाहून डॉक्टर याबाबतचा निर्णय घेतील. सध्यातरी आम्ही सर्व आमच्या नातवंडाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत.करिनाने आपल्या आयुष्यात नेहमीच योग्य निर्णय घेतले आहे. करिनाला कामाची आवड असल्यामुळे तिला बसून राहणे आवडत नाही. करिना ही स्वतंत्र असून ती जबाबदारीने आपले काम करते हे सैफला देखील माहिती आहे. मात्र काम व प्रेग्नेंसी यामुळे काही त्रास होऊ नये  यामुळे सैफ जरा चिंतेत असल्याचे रणधीर कपूर म्हनाले. करिनाने बॉलिवूडमध्ये प्रेग्नेंसी ट्रेन्ड आणला आहे. प्रेग्नेंट असताना देखील तिने अनेक प्रोजेक्ट पूर्ण केल. प्रेग्नेंट असताना देखील तुम्ही स्टायलिश राहू शकता याची जाणीवच तिने करून दिली आहे. यासोबतच मुलं झाल्यावरही आपले आयुष्य पूर्वी सारखे राहिल असे तिने सांगितले होते. सैफ व करिना यांच्या जोडीला मीडियात व बॉलिवूडमध्ये ‘सैफिना’ या नावाने ओळखले जाते. करिनाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये आपल्या बाळाचे नाव ‘सैफिना’ असून शकते असे सांगितले होते. तुर्तास आपण करिनाच्या गोड बातमीची प्रतिक्षा करूयात!