Join us  

बाबो! बॉलिवूडचा 'हा' टॉपचा कोरिओग्राफर कधीकाळी होता शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 3:45 PM

सिनेमांची कोरिओग्राफी करण्यासोबतच त्याने काही सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे.

तो आला त्याने पाहिलं, त्याने जिंकलं असाच काहीस म्हणावं लागलं कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजाबद्दल.  1995 साली त्याने त्याच्या करिअरची सुरूवात केली होती. 2000 साली ‘दिल पे मत ले यार’ या सिनेमासाठी कोरिओग्राफी करण्याची संधी त्याला मिळाली आणि यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आता तो इंडस्ट्रीतील टॉप कोरिओग्राफरपैकी एक आहे. पण हाच रेमो डिसूजा कधी काळी शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर होता. 2018 मध्ये शाहरुख खानने एक रिऑलिटी शोच्या मंचावर हा खुलासा केला होता.

शाहरूखने सांगितले की, ''माझ्या मागे गाण्यात बॅकग्राऊंडला सडपातळ तरूण मुलगा मागे नाचत होता, पण त्यावेळी मला त्या मुलाचे नावही ठाऊक नव्हते. मात्र पुढे याच लहान मुलाने संपूर्ण बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवले. तो दुसरा तिसरा कोणी नसून आजच्याघडीला भारतातील एक सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर रेमो डिसूझा आहे. रेमोने ऐवढे यश कला आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. ऐवढेच नाही तर शाहरुखने रेमोच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण देखील केली.''

रेमो डिसुजाने अनेक सिनेमांची कोरिओग्राफी करण्यासोबतच काही सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. एबीसीडी, एबीसीडी 2 आणि स्ट्रीट डांसर या सिनेमांचे त्याने दिग्दर्शन केले.

टॅग्स :रेमो डिसुझाशाहरुख खान