बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’souza) याचा मेव्हणा जैसन वाटकिंसन (Jason Watkins) याने राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर जैसनची बहीण आणि रेमो डिसूजाची पत्नी लिजेल (Lizelle D’souza) हिने इन्स्टास्टोरीवर भावाच्या फोटोंसोबत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.का? तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही..., असं पहिल्या पोस्टमध्ये लिजेलने लिहिलं आहे.अन्य एका पोस्टमध्ये लिजेलने भाऊ जैसन आणि आईचा फोटो शेअर केला आहे. यात जैसन त्याच्या आईसोबत ऑटोत बसलेला दिसतोय. या फोटोसोबत लिजेलने लिहिलेलं कॅप्शनही भावुक करणारं आहे.‘आई मला माफ कर... मी तुला निराश केलं...,’ असं लिजेलने लिहिलं आहे.
जैसन मुंबईत राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. भावाच्या या टोकाच्या निर्णयाने रेमो डिसूजा व लिजेल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा रेमो व लिजेल गोव्यात होते. एका लग्नसोहळ्यासाठी ते गोव्याला गेले होते. जैसन हा फिल्म इंडस्ट्री अनेक वषार्पासून काम करत होता. रेमो डिसूझा यांच्या सर्व प्रोजेक्टमध्ये तो असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहायचा. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे.