Join us  

'तुम बिन' मधून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री आता करते तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 5:38 PM

'तुम बिन' सिनेमातून ती रातोरात स्टार झाली खरी पण तिचं स्टारपण हे फार काळ टिकलं नाही. पण ती अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. चला जाणून घेऊ सध्या संदली करतेय तरी काय आणि कुठे आहे.

90 च्या काळात अनेक असे अशा अभिनेत्री आहेत ज्या एका सिनेमातून लोकप्रिय तर झाल्या पण पुढे आपली लोकप्रियता टिकवून ठेवू शकल्या नाहीत किंवा असू म्हणूया या की, बॉलिवूडमध्ये टिकाव धरू शकल्या नाहीत. या अभिनेत्रींमध्ये 'तुम बिन' सिनेमातील अभिनेत्री संदली सिन्हा आहे. 'तुम बिन' सिनेमातून ती रातोरात स्टार झाली खरी पण तिचं स्टारपण हे फार काळ टिकलं नाही. पण ती अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. चला जाणून घेऊ सध्या संदली करतेय तरी काय आणि कुठे आहे.

२००१ सालात 'तुम बिन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. इतकी की, आजही ऐकायला मिळते. या  सिनेमाचा उल्लेख होताच गाण्यांसोबतच या आठवतो या सिनेमातील अभिनेत्री संदलीचा निरागस चेहरा. या सुंदर सालस अभिनेत्रीने अनेकांच्या मनात घर केलं होतं. 

संदली तुम बिनमध्ये प्रियांशू चटर्जी, हिमांशू मलिक आणि राकेश वशिष्ठ या अभिनेत्यांसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमानंतर आणखी काही सिनेमांमधून संदली दिसली. पण ज्या सिनेमात ती दिसली त्यात तिच्या मुख्य भूमिका नव्हत्या. तिला दुय्यम भूमिका मिळाल्या आणि त्याही मोठ्या स्टार्सच्या सिनेमात. त्यामुळे ती एका बाजूला हरवून गेली.

'पिंजर' आणि 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' या सिनेमात तिने काम केले होते. पण फार लक्षात राहिली नाही. झालं..इथूनच तिच्या करिअरचा ग्राफ लगेच घसरायला सुरू झाला. अनेक प्रयत्न करूनही ती इंडस्ट्रीत स्थिरावली नाही. कारण इतर काही अभिनेत्री आपल्या बोल्ड अवताराने लोकप्रिय होत होत्या.

अखेर संदलीने २००५ मध्ये बिझनेस मॅन किरण सालस्कर सोबत लग्न केले. लग्नानंतर संदलीने पुन्हा अभिनयात नशीब आजवमावण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी बॉलिवूडऐवजी तिने साउथ सिनेमात प्रयत्न केला. पण इथेही ती फार काही कमाल दाखवू शकली नाही. 

अशात ती बिझनेसमध्ये उतरली. संदली भारतातील सर्वात मोठी बेकरी ब्रँड ‘कंट्री ऑफ ओरिजन’ची फाउंडर आहे. तसेच संदली आता दोन मुलांची आई आहे. भलेही आज ती इंडस्ट्रीत नाही पण ती तिच्या तुम बिन या एका सिनेमामुळे आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आजही तिला ओळखणारे अनेक तिचे अनेक चाहते आहेत.

हे पण वाचा :

सुष्मिताने 'मेहबूब मेरे' गाण्यावर 'या' कारणाने डान्स करण्यास दिला होता नकार, एका फॅनने सांगितला किस्सा!

नशा है नशा! तारक मेहताच्या नव्या एपिसोडवर फॅन्स झाले खूश, व्हायरल झालेत एकापेक्षा एक भन्नाट मीम्स!

टॅग्स :बॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स