Join us

तापसी पन्नू, अमित संध यांच्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 18:23 IST

Running Shaadi.com trailer : Amit Sadh and Taapsee Pannu are ready to help elope ; तापसी पन्नू व अमित संध यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या रनिंग शादी डॉट कॉम या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. लग्न जोडून देणाºया दोन युवकांची ही कथा असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘पिंक’ या चित्रपटातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकल्यावर तापसी पन्नू पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. मागील चित्रपटातून महिलांच्या नकाराला महत्त्व देणारी तापसी यावेळी मात्र लग्न जुळविण्यात व्यस्त असल्याचे दिसणार आहे. तापसी पन्नू व अमित संध यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या रनिंग शादी डॉट कॉम या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. लग्न जोडून देणाºया दोन युवकांची ही कथा असल्याचे सांगण्यात येत आहे. शूजित सरकार यांच्या प्रॉडक्शनचा ‘रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटचे काम काही कारणांमुळे अडकले होते. मात्र आता या चित्रपटाने गती पकडली असून, ३ फे ब्रुवारीला रिलीज करण्यात येणार आहे. ‘रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटाची क था दोन तरुणांवर आधारित असून, दोघेही युवकांना लग्न व जोडीदार शोधून देण्यात मदत करतात. मात्र, ज्या जोडप्यांना इंटरकास्ट मॅरेज करायचे आहे, त्यांना घरून पळून जाण्यात व त्यांचे लग्न लावून देण्यात तापसी व अमित मदत करताना दिसणार आहेत. ‘भगायेंगे हम निभायेंगे आप’ असे स्लोगन असलेल्या रनिंग शादी डॉट कामचे दिग्दर्शन अमित रॉय यांने केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आजच रिलीज केला जाणार आहे. रनिंग शादी डॉट कॉम या चित्रपटात काय पो चे या चित्रपटातील नायक अमित संध प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अमितने गुड्डू रंगीला व सुल्तान या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाबद्दल माहिती देताना अमित संध म्हणाला, मागील दोन वर्षे माझ्यासाठी कठीण होती, आता मात्र मी आनंदी आहे. लवकरच आमचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ही एका लहान शहरातील लव्ह स्टोरी असून, याची कथा चांगली आहे. चित्रिक रणादरम्यान तापसी पन्नूसोबत माझी चांगली मैत्री झाली.