Join us

‘बाहुबली2’च्या टीमसमोर ‘रिलीज डेट’चे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 14:29 IST

‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ अर्थात ‘बाहुबली2’ या चित्रपटाकडे सध्या तमाम सिनेप्रेमींचे डोळे लागले आहेत. हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी ...

‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ अर्थात ‘बाहुबली2’ या चित्रपटाकडे सध्या तमाम सिनेप्रेमींचे डोळे लागले आहेत. हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. येत्या १५ एप्रिलला ‘बाहुबली2’ रिलीज होणार आहे. ही रिलीज डेट मिस होता कामा नये, यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या रात्रंदिवस खपते आहे. तूर्तास या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. चित्रपटातील काल्पनिक जग अगदी खरे वाटावे यासाठी यात व्हीएफएक्स तंत्राचा वापर केला गेला आहे. या व्हीएफएक्स तंत्राबाबत ऐकाल तर तुम्हीही अचंबित व्हाल. ‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ चे व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरवाईजर आरसी कमलाकन्नन यांचे ऐकाल तर,‘बाहुबली2’साठी व्हिज्युअल इफेक्ट्स साकारणे हे  अतिशय कठीण कामआहे. अर्थात या कामानंतर मिळणारे समाधान तितकेच आनंददायी आहे. कमलाकन्नन यांनी सांगितले की,‘बाहुबली- दी कन्क्लूजन’च्या व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम हातात घेऊन सुमारे १५ महिने झाले आहेत. जवळपास सर्वच मोठ्या व्हीएफएक्स स्टुडिओत हे काम सुरु आहे.  जगातील सुमारे ३३ स्टुडिओ या कामी लागले आहेत. रिलीज डेटच्या आधी हे काम पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यावर आहे. कमलाकन्नन यांनी याआधी ‘मगधीरा’ व ‘पुली’ यासारख्या चित्रपटांच्या व्हीएफएक्सवर काम केलेय. ‘बाहुबली- दी कन्क्लूजन’मध्ये अभिनेता प्रभास, राणा डग्गूबती, अनुष्का शेट्टी, राम्या कृष्णन आणि सत्यराज लीड रोलमध्ये आहेत. हा चित्रपट एकाचवेळी तामिळ, तेलगू,मल्याळम आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ALSO READ : प्रभासच्या ‘बाहुबली २’ ला होणार का उशीर?​‘बाहुबली2’ची प्रतीक्षा करणा-यांसाठी एक आनंदाची बातमी...!‘बाहुबली- दी बीगिनिंग’ अर्थात ‘बाहुबली पार्ट1’मध्ये अमरेन्द्र बाहुबली आणि अवंतिकाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.   ‘बाहुबली- दी कन्क्लूजन’मध्ये मात्र महेन्द्र बाहुबली आणि देवसेनेची कथा आपण बघणार आहोत. अलीकडे या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता.