Join us

‘छम छम’ गाण्याचा टीजर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 08:42 IST

‘बाघी’ हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा पहिलाच चित्रपट असून चित्रपटातील गाणीही सर्वांना ठेका धरा

‘बाघी’ हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा पहिलाच चित्रपट असून चित्रपटातील गाणीही सर्वांना ठेका धरायला लावणारी असल्याचे कळते आहे. नुकतेच ‘छम छम’ हे श्रद्धा कपूरवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे.श्रद्धा या गाण्यात खुप सुंदर आणि आकर्षक दिसते आहे. ती पावसात नाचते आहे आणि टायगर श्रॉफचे काही झलक फोटो दाखवण्यात येत आहेत. मोनाली ठाकूरने गायलेले हे गाणे अतिशय श्रवणीय आहे. मुख्य भूमिकेतील टायगर आणि श्रद्धा यांच्यातील केमिस्ट्रीविषयी चर्चा काही दिवसांपासून सुरूच आहे.‘बाघी’ हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून रिलीज होणार आहे. साबिर खान दिग्दर्शित चित्रपट असून टायगरचा हा दुसरा चित्रपट आहे. २०१४ मध्ये त्याने ‘हिरोपंती’ मधून बॉलीवूड एन्ट्री केली होती.