Join us

विद्याचा पतीसमवेत काम करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:06 IST

अभिनेत्री विद्या बालनच्या अनुसार तिचा पती आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर हे लग्न टिकून राहावे या उद्देशाने एकत्र काम ...

अभिनेत्री विद्या बालनच्या अनुसार तिचा पती आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर हे लग्न टिकून राहावे या उद्देशाने एकत्र काम करणार नाहीत.‘आम्ही एकत्र काम करु इच्छित नाहीत. आमचे नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. काही वेळा चांगले चित्रपट हातातून निघून जातात, परंतू मला वाटते अशी कुर्बानी देणे गरजेचे आहे. आमचे व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य एकत्रित करु नये असे आपले वैयक्तिक मत असल्याचे विद्या म्हणाली. विद्या ही टी३एन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. थ्रिलर चित्रपट करणे आवडते. मी काही चित्रपट केले आहेत. सुदैवाने ते सर्व चित्रपट उपयोगी पडले आहेत. मला वाटते चांगला चित्रपट हा नेहमीच चांगला आहे. यामुळे त्याची किंमत वाढते असे विद्या म्हणाली.