Join us  

Birthday Special : नवऱ्यानं सोडल्यानंतर मुलीसाठी गॉडफादर बनली होती ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:56 PM

नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर या दिवंगत अभिनेत्रीनं आपल्या मुलीचा एकटीनं सांभाळ केला, आज त्यांची ही मुलगी सिनेक्षेत्रात कार्यरत आहे.

बॉलिवूडची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची आज जयंती असून आजही त्या रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. त्यांनी १८ मे, २०१७ साली जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी सिनेसृष्टीदेखील हळहळली होती. 

रिमा लागू याांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रिमा यांनी हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलंय.

चित्रपटांशिवाय रिमा लागू खऱ्या आयुष्यात मॉर्डन आई होती. चित्रपटात काम करीत असताना त्यांची प्रसिद्ध मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी भेट झाली. त्यानंतर काही वर्षांनंतर रिमा लागू व विवेक लागू यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव मृण्मयी आहे.

मृण्मयी नाटक व चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. यासोबत ती थिएटर दिग्दर्शकदेखील आहे. लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत चालू असताना रिमा व त्यांच्या नवऱ्यामध्ये मतभेद व्हायला लागले आणि अखेर काही वर्षांनंतर ते विभक्त झाले.

नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर रिमा यांनी पुन्हा लग्न केलं नाही आणि एक सिंगल आई बनून त्यांनी आपल्या मुलीचे पालन पोषण केलं. स्वतःला व त्यांच्या मुलीला यातून सावरण्यासाठी रिमा यांनी जी-तोड मेहनत केली. त्यांनी मुलीला कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. एक सिंगल मदर असतानाही त्यांनी मुलीला स्वतःच्या पायावर उभं केलं. 

टॅग्स :रिमा लागू