Join us  

या कारणामुळे नाही छापल्या प्रियांकाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:42 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नात फक्त दोघांच्या कुटुंबातील केवळ ८० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नात फक्त दोघांच्या कुटुंबातील केवळ ८० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. प्रियांकाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका छापल्या नसल्याची माहिती प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी दिली. लग्नपत्रिकेची गरज भासली नाही. काही निवडक पाहुण्यांना फोनवरच निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियांकाच्या लग्नाचे निमंत्रण तिचे गाव बरेलीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मिळाले नाही. तरीसुद्धा बरेलीचे लोक आपल्या 'मुलीचा' लग्नसोहळा धुमधडाक्यात साजरा करत आहे. तसेच प्रियांकाच्या घरासमोर फटाके वाजवून मिठाई वाटत आहे. मधु चोप्रा म्हणाल्या, आम्ही बरेलीच्या लोकांना शुभेच्छा पाठवत आहोत. व्यस्त असल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करु शकलो नाही. मात्र, वेळ भेटताच त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. जोधपूरमधल्या आलिशान उमेद भवन येथे निक आणि प्रियांकाचे लग्न व्हावे,अशी प्रियांकाच्या आईची इच्छा होती. या इच्छेचा मान ठेवत प्रियांकाने उमेद भवनमध्ये दोन्ही परंपरांच्या पद्धतीने निकसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे आता प्रियांका अधिकृतपणे जोनास कुटुंबाची सून झाली आहे. प्रियांकाच्या वडीलांचे २०१३ मध्ये निधन झाल्यामुळे तिचे कन्यादान कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अभिनेत्री परिणिती चोप्राचे वडील पवन चोप्रा आणि त्यांची पत्नी रीना यांनी प्रियांकाचे कन्यादान केले. लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.  निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा रोका झाला होता.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास