Join us  

या कारणामुळे दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना वाटायचे की तिने चित्रपटात पाऊल ठेवू नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 2:16 PM

आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव आज बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. त्याचबरोबर सर्वाधिक मानधन स्वीकारणाºया अभिनेत्रींमध्ये दीपिका ...

आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव आज बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. त्याचबरोबर सर्वाधिक मानधन स्वीकारणाºया अभिनेत्रींमध्ये दीपिका आघाडीवर आहे. दीपिकाने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजविला आहे. मात्र दीपिकाला मिळालेले हे यश म्हणावे तेवढे सहजासहजी मिळाले नाही. कारण तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तुम्हाला माहिती आहे काय की, दीपिकाच्या आई-वडिलांना अजिबातच वाटत नव्हते की, तिने बॉलिवूडमध्ये काम करावे? काही दिवसांपूर्वीच दीपिकाच्या हस्ते ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीचे प्रकाशन करण्यात आले. हेमा मालिनी यांच्या जीवनावर राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘Beyond The Dream Girl’ या पुस्तकात हेमा यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. मात्र जेव्हा दीपिका या सोहळ्याला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती, तेव्हा तिनेही तिच्या आयुष्याशी निगडित काही खुलासे केले. जुन्या आठवणींना उजाळा देताना दीपिकाने म्हटले होते की, ‘मी खूपच कमी वयात काम करण्यास सुरुवात केली. बारावीची परीक्षा दिल्यानंतर मी पुढे शिक्षण घेतले नाही. माझ्या या निर्णयामुळे माझे आई-वडील फारसे खूश नव्हते. त्यामुळे त्यांनी मला सुरुवातीला म्हणावा तेवढा सपोर्ट केला नाही. कारण त्यांना असे वाटत होते की, मी अगोदर शिक्षण पूर्ण करावे. त्यांना असेही वाटत होते की, मी अशाप्रकारच्या प्रोफेशनसाठी शिक्षण सोडू नये. कारण या प्रोफेशनमध्ये भविष्यात सगळं काही चांगलंच घडेल, याची काहीही शाश्वती नाही. यावेळी दीपिकाने हेदेखील म्हटले होते की, मध्यमवर्गीय कुटुंबीय ज्या पद्धतीने आपल्या मुलांबद्दल विचार करते, त्याच पद्धतीने माझे आई-वडील माझ्याबद्दल विचार करीत होते. मात्र त्यानंतर मी केलेल्या कठोर परिश्रमानंतर माझ्या आई-वडिलांचे माझ्याबद्दलचे विचार बदलले. मात्र हे सर्व मिळविण्यासाठी मला माझे शिक्षण सोडावे लागल्याचे दु:ख होते. खरं तर आजही मी माझ्या फॉर्मल स्टडीला मिस करते.