Join us  

या कारणामुळे अर्जून कपूर आणि परिणीती चोप्रा एकमेकांशी बोलणं टाळतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 11:43 AM

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर लवकरच संदीप और पिंकी फरार चित्रपटात दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघे गेल्या ...

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर लवकरच संदीप और पिंकी फरार चित्रपटात दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांशी बोलत नाही आहे. या मागचे कारण तुम्ही विचार करता तसे नाही आहे. या दोघांचे काही भांडण झाले नाहीये. तर दिग्दर्शक दिबाकर बनर्जीने या दोघांना एकमेकांशी बोलण्यास मनाई केली आहे. पहिला शॉर्ट देण्याआधी हे दोघे एकमेकांशी बोलू शकत नाहीत अशी ताकीद या दोघांना देण्यात आली आहे. ऐवढेच नाही तर दोघांना सार्वजनिक ठिकाणी भेटण्यासाठी देखील मनाई केली आहे.    या गोष्टीचा खुलासा दिबाकर बनर्जी यांनी एक इंटरव्ह्रु दरम्यान केला कि, मला माहिती आहे कि परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून मित्र-मैत्रिण आहेत. मात्र या चित्रपटाची ही गरज आहे की सुरुवाती त्यांच्यातील केमिस्ट्री दिसू नये.  चित्रपट सुरु करण्यापूर्वी हे दोघे एकमेकांचे मित्र-मैत्रीण म्हणून लोकांच्या समोर येई नयेत.  त्यामुळे या दोघांना सध्या एकमेकांशी न बोलण्याची ताकीद दिली आहे. हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे कळले आहे. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे.‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसणार आहे. सूत्रांचे मानाल तर अर्जुन व परिणीती दोघेही या चित्रपटात परंपरागत बॉलिवूड स्टाईलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटींग उत्तर भारतात होणार आहे. दोन महिने हे शूटींग चालणार आहे.  अर्जुन व परिणीत यांनी याआधी ‘इशकजादे’ मध्ये एकत्र काम केले आहे. ‘संदीप और पिंकी फरार’नंतर ही जोडी विपुल शाह यांच्या ‘नमस्ते कनाडा’मध्येही दिसणार आहे.