Join us  

 या कारणामुळे अनुप सोनीने सोडला होता 'सोन चिरैया'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:32 PM

अनुप सोनी आता पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो 'प्रस्थानम' सिनेमात अभिनेता संजय दत्तसोबत झळकणार आहे.

ठळक मुद्दे 'प्रस्थानम' सिनेमात अनुप सोनी दिसणार महत्त्वपू्र्ण भूमिकेत 'प्रस्थानम' चित्रपट करतो नात्यावर भाष्य

अभिनेता अनुप सोनी बऱ्याच कालावधीपासून छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो करत होता. 'क्राईम पेट्रोल' या मालिकेतून तो घराघरात पोहचला. मात्र मालिकांमुळे तो खूपच व्यग्र होता. त्यामुळे त्याला इतर प्रोजेक्टमध्ये काम करता येत नव्हते. या मालिकेमुळे त्याला अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटात काम करायला नकार दिला.

'सोन चिरैया' चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत व अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी अनुप सोनीला क्राईम पेट्रोलमुळे सोडावी लागली. याबाबत अनुप सोनीने सांगितले की, ''सोन चिरैया' चित्रपटासाठी मला वेगळा लूक करावा लागणार होता. मला मालिकेसाठी क्लिन शेव्ह करायला लागत होती आणि सिनेमासाठी मला दाढी वाढवावी लागणार होती. तीस दिवस मला दाढी करता येणार नव्हती आणि मला हे शक्य नव्हते. त्यामुळे मला 'सोन चिरैया' चित्रपटाला नकार द्यावा लागला.'मालिकेचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर अनुप सोनीने शो सोडला आणि चित्रपटात काम करायचे ठरविले. आठ वर्षांच्या गॅपमुळे माझे चित्रपट निर्मात्यांचे कॉन्टॅक्ट तुटल्याचे सोनीने सांगितले व म्हणाला की,' २००८ साली 'ये हौसला' चित्रपटात शेवटचे काम केले होते आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या सिनेमाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये झाले आहे. त्यानंतर मी दोन-तीन चित्रपटात काम केले. त्यानंतर मला ही मालिका मिळाली.' अनुप सोनी आता पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो 'प्रस्थानम' सिनेमात अभिनेता संजय दत्तसोबत झळकणार आहे. या चित्रपटात अनूप सोनी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अनुपने सांगितले की, 'हा चित्रपट नात्यावर भाष्य करतो. मी संजय आणि इतर पात्र एकाच कुटुंबातील आहेत. मी साकारत असलेल्या पात्रामुळे एक घटना घडते आणि कथेत नवे वळण येते.'