Join us  

Then & Now चंदेरी दुनियेला बाय बाय केलेली किमी काटकर पाहा सध्या काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 11:33 AM

अनिल कपूर सोबतचा ‘हमला’ हा शेवटचा  सिनेमात ती झळकली होती. किमीने बॉलिवूड का सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला होता. एकदा एका मुलाखतीत तिने यामागचे कारण सांगितले होते.

वर्ष 1985 'पत्थर दिल' या सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात करणार्‍या किमी काटकरची ओळख 'टार्जन'  सिनेमातून  बोल्ड अभिनेत्री म्हणून निर्माण झाली होती.  या सिनेमात किमीने एकापेक्षा  एक जबरदस्त  बोल्ड सीन देत सा-यांची झोप उडवली होती. अमिताभ बच्चन यांच्या 'हम' सिनेमाचे 'जुम्मा-चुम्मा' हे गाणे आजही रसिकांच्या ओठावर रुळते. अमिताभ आणि किमी काटकर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच किमीने   बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. मात्र अचानक किमी चंदेरी दुनियेपासून दूर जात इंडस्ट्रीतून गायब झाली.

किमी काटकर ही अभिनेत्री टिना काटकर यांची मुलगी. टिना काटकर या बॉलिवूड अभिनेत्री तसेच कॉस्टयूम डिझायनर म्हणूनही ओळखल्या जात. 60 आणि 70 च्या दशकातील 'वल्लाह क्या बात है', 'जवानी दिवाणी', 'चंगेज खान' यासारख्या सिनेमात टिना काटकर यांनी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या होत्या. आईच्या पावलावर पाऊल टाकत किमी काटकर हिने देखील अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली होती.

बॉलिवूडमधील 7 वर्षांच्या कारकिर्दीत किमीने सुमारे 45 सिनेमात काम केले होते.  लोकप्रिय झालेल्या किमीने 1992 मध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि अचानक इंडस्ट्रीला निरोप दिला.

मीडिया रिपोर्टनुसार किमीला बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे  शोषण केले जात असल्याचे तिने म्हटले होते. याच कारणामुळे बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी उत्सुक नसायची. नेहमीच अभिनेत्रींमध्ये तुलना केली जायची. याच गोष्टीचे दुःख किमीला होते.त्यामुळेच समाधानकार वागणूक मिळत नसल्याचे कारण देत बॉलिवूडला कायमचा राम-राम ठोकला. 

अनिल कपूर सोबतचा ‘हमला’ हा शेवटचा  सिनेमात ती झळकली होती. किमीने बॉलिवूड का सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला होता. एकदा एका मुलाखतीत तिने यामागचे कारण सांगितले होते.

इंडस्ट्री बाहेरून जशी दिसते तितकीच आतून खूप निराशादायी वातावरण असते.जे तिला अजिबात आवडत नव्हते. आपल्याला हव्या तशा भूमिका साकारायच्यात तसे सिनेमा बनत नसल्याने सिनेसृष्टीपासून दूर जात असल्याचे तिने सांगितलं होतं. बॉलिवूड सोडल्यानंतर किमीने  शांतनु श्योरेसह लग्न करत ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. 

टॅग्स :किमी काटकरअमिताभ बच्चन