Join us

​या ‘Ex-Lovers’चा ‘आॅनस्क्रीन रोमान्स’ पाहण्यासाठी व्हा सज्ज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 17:50 IST

कामात पर्सनल गोष्टी येता कामा नये, याचे सगळ्यांत चांगले उदाहरण म्हणजे बॉलिवूड. होय, बॉलिवूडच्या अनेक एक्स-लव्हर्सनी हे सिद्ध केलयं. ...

कामात पर्सनल गोष्टी येता कामा नये, याचे सगळ्यांत चांगले उदाहरण म्हणजे बॉलिवूड. होय, बॉलिवूडच्या अनेक एक्स-लव्हर्सनी हे सिद्ध केलयं.  ब्रेकअप झाल्यानंतरही आॅनस्क्रीन रोमान्स करायला अनेक जोडप्यांनी मागे पुढे पाहिले नाही. एकंदर काय तर प्रोफेशनल लाईफ वेगळे अन् पर्सनल लाईफ वेगळे, हेच या जोडप्यांनी दाखवून दिलय. रणबीर कपूर-कॅटरिना कैफ, सलमान खान- कॅटरिना कैफ, श्रद्धा कपूर- आदित्य राय कपूर. वरूण धवन- आलिया भट्ट यापैकी एक़ हे एकेकाळी रिलेशनशिपममध्ये असलेली जोडपी लवकरच पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. त्यावर एक नजर...सलमान खान- कॅटरिना कैफसलमान खान एकेकाळी कॅटरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही याबद्दल बोलणे टाळतात. पण त्यांचे रिलेशन कुणापासूनही लपून राहिलेले नाही. कॅटरिनाच्या करिअरमध्ये सलमानचा मोठा हात आहे, असेही मानले जाते. पण अचानक दोघांत काहीतरी बिनसले आणि कॅटरिनाचे रणबीर कपूरशी सूर जुळले. सलमान व कॅटरिना याचे नाते इथेच संपले. अर्थात पर्सनल नाते संपले पण प्रोफेशनल नाते मात्र दोघांमध्येही कायम आहे. त्याचाच पुरावा म्हणजे, ‘एक था टायगर’च्या सीक्वल ‘टायगर जिंदा है’मध्ये सलमान व कॅटरिना एकत्र येणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.रणबीर कपूर - कॅटरिना कैफरणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. रणबीर तर स्वत:चे घर सोडून कॅटरिनासोबत लिव्ह इनमध्येही राहू लागला होता. पण काही महिन्यात या दोघांमध्ये ब्रेकअप झाले. रणबीर व कॅटरिनाचे ब्रेकअप हे बॉलिवूडसाठीच नव्हे तर या दोघांच्या चाहत्यांसाठीही मोठा धक्का होता. पण याऊपरही हे दोघे ‘जग्गा:जासूस’ या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. ‘जग्गा:जासूस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकंदर काय तर रिअल लाईफमधील रोमान्स संपला तरी कॅट व रणबीरचा आॅनस्क्रीन रोमान्स मात्र प्रेक्षकांना पाहता येणार आहे.आदित्य राय कपूर- श्रद्धा कपूर‘आशिकी2’च्या सेटवर आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूर जवळ आले. यानंतर सुमारे वर्षभर दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण यानंतर दोघांमध्येही बिनसले आणि सगळेच संपले. या ब्रेकअपपश्चात दोघांनीही ‘ओके जानू’ हा चित्रपट साईन केला. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी अलीकडे रिलीज झालेत. त्यातील दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री रंगलीय. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होतोय.वरूण धवन- आलिया भट्टवरूण धवन आणि आलिया भट्ट यांच्या कथित अफेअरच्या, डेटिंगच्या चर्चा बºयाच गाजल्या. अर्थात दोघांनीही हे रिलेशन कधीच मान्य केले नाही. पण कालांतराने ही रिलेशनशिप संपुष्टात आली. अर्थात प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल लाईफ येता कामा नये, हे या एक्स लव्हबडर््सने दाखवून दिले. हे एक्स-लव्हर्स लवकरच ‘बद्रिनाथ की दुल्हनियां’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘बद्रिनाथ की दुल्हनियां’ हा ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ या चित्रपटाचा सीक्वल आहे.