Join us

​वाचा, ‘इंदू सरकार’,‘उडता पंजाब’,‘बजरंगी भाईजान’बद्दल पहलाज निहलानी यांचे धक्कादायक खुलासे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 16:34 IST

केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे (सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांची अध्यक्षपदाची कारकिर्द कधी नव्हे इतकी वादग्रस्त ...

केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे (सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांची अध्यक्षपदाची कारकिर्द कधी नव्हे इतकी वादग्रस्त ठरली. अनेक दिग्दर्शक-निर्मात्यांनी त्यांच्याविरोधात उघड-उघड मोर्चा उघडला आणि अचानक त्यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी प्रसून जोशी आलेत आणि बॉलिवूडने जणू सुटकेचा नि:श्वास सोडला. अर्थात निहलानी गेलेत म्हणून वाद संपला असे समजण्याचे कारण नाही. होय, कारण सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केलेत. आता तर एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी  थेट ‘इंदू सरकार’ चित्रपटाबाबत गौप्यस्फोट केलाय. माझे अध्यक्षपद जाण्यामागे राज्यवर्धन सिंग राठोड, अनुराग कश्यप आणि एकता कपूर  हे जबाबदार असल्याचे निहलानी म्हणाले होते. आता त्यांनी  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनाही यासाठी जबाबदार ठरवले आहे.  स्मृती इराणींनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कामकाज स्विकारले, तेव्हाच ‘इंदू सरकार’ चित्रपटावरून वाद सुरू होता. स्मृती इराणींना त्यांचे वर्चस्व सिद्ध करायचे होते. माध्यमांमध्ये मी वादग्रस्त ठरलो अन् त्यांना आयती संधी मिळाली. माझे पद काढून घेण्यासाठी त्यांना फार वेळ लागला नाही. मी ‘इंदू सरकार’ कोणत्याही कटशिवाय प्रदर्शित होऊ देत नव्हतो,म्हणून त्यांच्या निशाण्यावर होतो. याच कारणामुळे माझी उचलबांगडी करण्यात आली, असा थेट आरोप त्यांनी केलाय.ALSO READ : सेन्सॉरच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानी यांची गच्छंती; आता प्रसून जोशींकडे धुरा!‘उडता पंजाब’ या चित्रपटाला मान्यता देऊ नका. असे मला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून सांगण्यात आले होते, असा आणखी एक धक्कादायक खुलासाही त्यांनी केला.    इतकेच नव्हे तर ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठीही माझ्यावर दबाव होता. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठी मला गृह खात्याकडून पत्र मिळाले होते, असेही त्यांनी सांगितले.