वाचा, रणबीरच्या ‘दिल्लीवाल्या गर्लफ्रेन्ड’चा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 20:02 IST
रणबीर कपूर त्याच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. कॅटरिना कैफ हिच्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर ‘दिल्ली गर्ल’ भारती मल्होत्रा हिच्याशी ...
वाचा, रणबीरच्या ‘दिल्लीवाल्या गर्लफ्रेन्ड’चा खुलासा
रणबीर कपूर त्याच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. कॅटरिना कैफ हिच्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर ‘दिल्ली गर्ल’ भारती मल्होत्रा हिच्याशी डेट करीत असल्याच्या बातम्या आहे. पेशाने मॉडेल असलेली भारती मात्र या बातम्यांनी चांगलीच वैतागली आहे. मी रणबीरशी डेट काय तर त्याला कधी भेटलेलीही नाही. मला तर कधीच त्याचे काम आवडलेले नाही. कदाचित रणबीर चांगला अॅक्टर असेलही पण मला तो कधीच आवडलेला नाही. मी अजिबात त्याची फॅन वगैरे नाही. त्याच्यासोबतच्या डेटच्या बातम्यांनी मी वैतागली आहे. आठवडाभरापासून तणावात आहे, असे भारतीने लिहिले आहे. माझे नाव रणबीर कपूरशी कसे जुळले, हे मला ठाऊक नाही. गत आठवड्यात माझ्या एका मित्राचा फोन आला होता. मी रणबीरशी डेट करते आहे का, असा प्रश्न त्याने मला विचारला. मला वाटते, तो गंमत करतोय. पण नंतर मला कळले की, मला रणबीरची दिल्लीवाली गर्लफ्रेन्ड ठरवले गेले होते. माझ्या नावासकट इंटरनेटवर असलेल्या बातम्या वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला. फेसबुकवरील माझा फोटो अनेक बातम्यांमध्ये वापरलेला दिसला. मला मिस्ट्री गर्ल ठरवले गेले. या सर्वांशी कसे निपटावे, हे मला ठाऊक नाही. मात्र हा गैरसमज दूर करणे मला गरजेचे वाटते. मला यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. मी कधीही रणबीरशी वा त्याच्या बहिणीशी भेटलेली नाही,असेही भारतीने स्पष्ट केले. आता भारतीचे स्पष्टीकरण वाचल्यावर गोंधळ तर आमचाही वाढलाय...काय खरयं ना??