सागरिकाचे पुन:पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 21:02 IST
‘चक दे’ चित्रपटात अनेक नव्या मुलींना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली होती. त्यातीलच एक होती सागरिका घाटगे. पण ‘चक दे’ नंतर ...
सागरिकाचे पुन:पदार्पण
‘चक दे’ चित्रपटात अनेक नव्या मुलींना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली होती. त्यातीलच एक होती सागरिका घाटगे. पण ‘चक दे’ नंतर ती फारशा हिंदी चित्रपटात दिसली नाही. मधल्या काळात तिने ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटात झळकली तेवढीच.आता बºयाच दिवसानंतर ती पुन्हा एका हिंदी सिनेमात चमकणार आहे. तिच्या सोबत असणार आहे नसिरुद्दीन शाह. आणि या हिंदी सिनेमाने नाव आहे ‘राधा’. नावावरून तरी हा चित्रपट महिलाप्रधान चित्रपट असेल असं वाटतंय. सिनेमाचं पहिलं शेड्युल पूर्ण झालं असून, वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सागरिकाला पडद्यावर पाहण्यासाठी मात्र तिचे चाहतेही उत्सुक आहेत.