Join us

रवीना टंडनच्या 'मातृ'चा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन प्रदीर्घ काळानंतर चित्रपटात परते आहे. नुकतेच तिच्या मातृ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. महिलांवर होणाऱ्या लैगिंग अत्याचाराच्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन प्रदीर्घ काळानंतर चित्रपटात परते आहे. नुकतेच तिच्या मातृ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. महिलांवर होणाऱ्या लैगिंग अत्याचाराच्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. रवीना या चित्रपटात तिला न्याय मागण्यासाठी कायद्याची मदत मागते पण तिथे तिची निराशा होते. यानंतर ती न्यायासाठी स्वत: संघर्ष करताना पाहायला मिळणार आहे.ट्रेलर लाँचिंगच्या ठिकाणी रवीना ट्रॅडिंशनल लूकमध्ये आली होती. ज्यात खूपच सुंदर दिसत होती.यावेळी चित्रपटाबाबत रवीना संवाद साधताना.रवीनासह चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.साडीत रवीनाच सौंदर्य खुलून दिसत होते.