Join us  

व्वा, म्हणजे पुन्हा थुंकणे सुरु होणार...! रवीना टंडन भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 10:12 AM

काय म्हणाली रवीना?

ठळक मुद्देदारूची दुकाने उघडण्याच्या निर्णयावर तूर्तास अनेक विरोधाचे स्वर ऐकू येत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले. मात्र या काळात काही झोनमध्ये काही निर्बंध शिथिल करण्याचा  निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि दारुची दुकाने तसेच पान मसाला, गुटखा व तंबाखू विक्रीलाही परवानगी दिली. अभिनेत्री रविना टंडन हिने या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पान, गुटख्याची दुकान उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर ती चांगलीच बरसली. ट्विट करून तिने आपला संताप बोलून दाखवला.

  ‘घ्या, पान-गुटख्याची दुकानें सुरु होणार. व्वा, म्हणजे पुन्हा थुंकणे सुरु होणार,’ असे उपरोधिक ट्विट तिने केले. रवीनाशिवाय दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनीही सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला होता. विशेषत: दारूची दुकाने उघडी करण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

‘लॉकडाऊनदरम्यान दारुची दुकान सुरु करणे अत्यंत चुकीचे ठरेल. गेल्या काही दिवसात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. त्यामुळे दारु विक्री सुरु केली तर ती महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते,' असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.दारूची दुकाने उघडण्याच्या निर्णयावर तूर्तास अनेक विरोधाचे स्वर ऐकू येत आहेत. एकीकडे मद्यप्रेमी दारूच्या दुकानांबाहेर गर्दी करत आहेत. दुसरीकडे या निर्णयावरून सरकारला टीका सहन करावी लागतेय. वाईन शॉपसमोर लोकांनी लावलेल्या रागांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे या तळीरामांविरोधात लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अनेक सेलिब्रेटींनी देखील सोशल मीडियाद्वारे लोकांच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :रवीना टंडनकोरोना वायरस बातम्या