Join us  

या अभिनेत्रीचा सिनेमा बघून आत्महत्या करू लागले होते प्रेमी युगुल, उचलावं लागलं होतं हे पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:58 AM

Rati Agnihotri Life Facts : 1981 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमातून रति हिंदी सिनेमात आली. आधी तर हा सिनेमा खरेदी करण्यासाठी कुणी तयार नव्हतं. पण जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा 10 लाखात बनलेल्या या सिनेमाने 10 कोटी रूपयांची कमाई केली. 

Rati Agnihotri Life Facts : बॉलिवूडमध्ये 80च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी आपल्या कामाच्या भरवशावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रति अग्निहोत्री (Rati Agnihotri). कुली आणि एक दूजे के लिए (Ek Duje Ke Liye) सारख्या सिनेमातून तिने आपली वेगळी छाप सोडली होती. केवळ 10 वर्षांची असताना तिने मॉडलिंग सुरू केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिने जागा मिळवली. पुथिया वारपुगल तिचा पहिला तमिळ सिनेमा होता. तिचा एक दूजे के लिए हिंदी सिनेमातील क्लासिक सिनेमापैकी एक आहे.

1981 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमातून रति हिंदी सिनेमात आली. आधी तर हा सिनेमा खरेदी करण्यासाठी कुणी तयार नव्हतं. पण जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा 10 लाखात बनलेल्या या सिनेमाने 10 कोटी रूपयांची कमाई केली. 

जसा सिनेमा रिलीज झाला याच्या क्लायमॅक्सने इन्स्पायर होऊन अनेक कपल्स सोबत आत्महत्या करू लागले होते. केसेस वाढल्या तर सरकारी संस्थांनी मेकर्सना हा सीन हटवण्याची मागणी केली. क्लायमॅक्स बदललाही आला, पण नंतर प्रेक्षकांच्या मागणीवर सिनेमा जुन्या क्लायमॅक्ससोबत री-रिलीज करण्यात आला. या सिनेमामुळे रति रातोरात स्टार बनली. तिला यासाठी पहिला फिल्मफेयर फॉर बेस्ट एक्ट्रेसचं नॉमिनेशन मिळालं. 

अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या रतिने 1985 मध्ये आर्किटेक्ट अनिल विरवानी (Anil Virwani) सोबत लग्न केलं आणि बॉलिवूड सोडलं. बऱ्याच वर्षानी 2001 मध्ये आलेल्या कुछ खट्टी कुछ मीठी मधून तिने कमबॅक केलं. लग्नाच्या 29 वर्षानंतर रतिने पतीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणि कौंटुंबिक हिंसेचा आरोप लावला होता. त्यानंतर तिने घटस्फोट घेतला. तिचा मुलगा तनुज बॉलिवूड अभिनेता आहे.

टॅग्स :रती अग्निहोत्रीबॉलिवूड