Join us  

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:34 PM

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना सध्या चांगलीच ट्रोल होतेय. होय, कारण काय तर तिची नवी जाहिरात...

ठळक मुद्देरश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. इंस्टाग्रामवर रश्मिकाचे 13 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. 

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) सध्या चांगलीच ट्रोल होतेय. होय, कारण काय तर तिची नवी जाहिरात.  रश्मिकाची ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय आणि ही पाहून लोक रश्मिकावर भडकल्याचे चित्र आहे.  जाहिरात आहे एका ब्रँडच्या अंतर्वस्त्रांची. यात जाहिरातीत रश्मिकासोबत विकी कौशल (Vicky Kaushal) दिसतोय.  रश्मिका विकीच्या अंडरगारमेंटवर फिदा झाल्याचं यात दाखवण्यात आलं आहे. रश्मिका या जाहिरातीत झळकली आणि लोकांनी तिला ट्रोल करणं सुरू केलं. तुझ्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती, म्हणत अनेकांनी तिला फैलावर घेतलं.

जाहिरातीत एक योगा सेशन सुरु असत. यावेळी योग करतांना विकी कौशलची अंडरगारमेंटची स्ट्रीप रश्मिकाला दिसते. ते पाहून अभिनेत्री रोमँटिक होते. त्यानंतर पुन्हा ते पाहण्यासाठी अभिनेत्री प्लॅन बनवते. अशा आशयाची ही जाहिरात आहे. 

या जाहिरातीवर अनेक नेटक-यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या जाहिरातींपैकी सर्वाधिक अश्लिल जाहिरात. रश्मिकासारखी अभिनेत्री मुलींबद्दल अशी चुकीचा संदेश कशी देऊ शकते? असा सवाल एका चाहतीने केला आहे.

‘रश्मिका ती तुझी जाहिरात पाहिली,  निराश झाले. तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात  नव्हती. तू एक नॅशनल क्रश आहेत. लाखो लोक तुझ्यावर प्रेम करतात. त्याचं भान ठेवायला हवं,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘ही कसली जाहिरात आहे? तुम्हाला ही गंमत वाटतेय का?,’ असा खरपूस सवाल एका युजरने केला.

रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. इंस्टाग्रामवर रश्मिकाचे 13 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू चित्रपटात झळकणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. सरीलेरू, नीकेवरू, गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या सारख्या दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनय पाहता आता रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानाविकी कौशल