Join us  

'रश्मि रॉकेट'ने पूर्ण केले पुण्यातील शेड्यूल, तापसी पन्नूला सेटवर मिळाले खास सरप्राईज

By गीतांजली | Published: November 17, 2020 5:09 PM

कच्छच्या रणापासून सुरुवात करून, रश्मि रॉकेट एका गावकरी तरुणीची कथा आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या 'रश्मि रॉकेट' सिनेमाच्या शूटिंगला या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात  केले आहे. तेव्हापासून तापसी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमा संबंधित फोटो शेअर करत आहे.

 दिवाळीच्या वेळेस  'रश्मि रॉकेट'च्या टीमने तापसीला कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता यावी, यासाठी तिच्या आई आणि बहिणीला सेटवर बोलावून घेत अभिनेत्रीला सरप्राईज दिले. 

पुण्यात रश्मी रॉकेटच्या टीमसाठी शूटिंगचे एक महिना वेळापत्रक होते, यादरम्यान सर्व गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आली आहे.या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला कंपनी 'आरएसव्हीपी' च्या बॅनरखाली केली जात आहे.. आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात 'एक्सट्रैक्शन' फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कच्छच्या रणापासून सुरुवात करून, रश्मि रॉकेट एका गावकरी तरुणीची कथा आहे, जिच्याकडे, वेगवान धावण्याची शक्ती आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला 'रॉकेट' म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते. 'रश्मि रॉकेट' 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :तापसी पन्नू