Join us

रणवीरचा फनी डबस्मॅश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 22:07 IST

सध्या शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.

सध्या शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. शाहरूखचे चाहतेच नव्हे तर त्याचे इंडस्ट्रीतील अजून फॅन्स आता या निमित्ताने समोर येत आहेत. रणवीर सिंग हा देखील शाहरूखचा खुप मोठा फॅन आहे. त्याने नुकताच ‘फॅन’ वर आधारित एक डबस्मॅश केला आहे.एका नव्या स्टाईलने या चित्रपटाचे प्रमोशन करायला सुरूवात केली आहे. त्याने टिष्ट्वटरवर डबस्मॅश व्हिडीओ पोस्ट केला आहे. अत्यंत फनी असा हा व्हिडिओ आहे. ‘जबरा’ फॅन प्रमाणेच रणवीरही डान्स करताना दिसतो आहे. रणवीरने हृतिक रोशनच्या ‘बँग बँग’ चित्रपटावेळी देखील गाण्यावर डान्स केला होता. त्या व्हिडीओला ‘फादर आॅफ मोशन पोस्टर्स’ असे कॅप्शन दिले होते.