Join us

रणवीरला व्हायचेय गोव्यात सेटल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 22:48 IST

 ‘बेफिक्रे’ च्या शूटींगच्या निमित्ताने रणवीर सिंग सध्या गोव्यात मजा करतोय. तो म्हणतो की,‘ गोव्यात माझं स्वत:चं घर असावं असं ...

 ‘बेफिक्रे’ च्या शूटींगच्या निमित्ताने रणवीर सिंग सध्या गोव्यात मजा करतोय. तो म्हणतो की,‘ गोव्यात माझं स्वत:चं घर असावं असं माझं स्वप्न आहे. मी केवळ वर्षातून एकच चित्रपट करणार आणि मग फावल्या वेळात मी पेंटींग, कुकिंग, मित्रांसाठी कुकिंग, योगा करण्यात मला माझं आयुष्य घालवायचंय.मी माझ्या कुटुंबीयांसाठी देखील जेवण बनवत असतो. त्यांना सर्वांना मी बनवलेलं बटर चिकन फार आवडतं.’ गोव्यातील थलासा या ठिकाणाविषयी सांगतांना तो म्हणाला,‘ मला थलासामधलं ग्रीक फुड बेहद आवडतं. तुमच्या दिवसाची परफेक्ट संध्याकाळ हे ठिकाण तुमच्यासाठी करतं.येथील रेस्टॉरंटहून व्हॅगेटर बीचचा अत्यंत सुंदर नजारा दिसतो.’ वेल, आर.एस. तु इतके छान सांगतोस की ना, आम्हालाही तिथे सेटल व्हावेसे वाटत आहे.