Join us  

रणवीर सिंह लोकप्रियतेतही अव्वल, हॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारलाही टाकले मागे, तोडला तिचाही रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 1:44 PM

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी 24 करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने नुकतेच त्यांच्या एका बातमीत म्हटले आहे. सेलिना केवळ 26 वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोव्हर्स आहेत.

सोशल मीडियावर रणवीर सिंहचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याने त्याच्या अभिनयनाच्या शैलीने आणि हटके अंदाजामुळे मोठ्या प्रमाणात यंगस्टर्सना आकर्षित केले आहे. रणवीर त्याच्या सिनेमांमुळे जेवढा जास्त चर्चेत असतो त्याहूनही अधिक तो त्याच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलने सा-यांचे लक्ष वेधून घेत असतो. रणवीरचे जगभरात चाहते आहेत. सातासमुद्रापरही रणवीरचे चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सोशल मीडियावर अनेक असे प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावर चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात. 

 

रणवीर सिंह अमेरिकेच्या प्रसिद्ध ऑनलाइन डेटाबेस आणि सर्च इंजिन Giphy वर देखील आहे. Giphy चा वापर Animated फोटो किंवा GIFs बनवण्यासाठी केला जातो. रणवीरला Giphy च्या चॅनेलवर 1.1 बिलियन व्हुज मिळाले आहेत. यामुळे रणवीरने 961 मिलियन लाइक्स मिळवणा-या सेलेना गोमझलाही मागे टाकले आहे. त्यामुळे देशातच नाहीतर सातासमु्रदापारही रणवीरचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळते.

 

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी 24 करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने नुकतेच त्यांच्या एका बातमीत म्हटले आहे. सेलिना केवळ 26 वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोव्हर्स आहेत. ती गायनासोबतच विजार्ड ऑफ वेवर्ली या मालिकेतील एलेक्स रुसोच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तसेच ती अँड द सीन नावाच्या पॉप बँडची मुख्य गायिका आहे. 

सेलिना खूपच लहान वयात एका आजाराला सामोरी गेली होती. सप्टेंबर 2017 मध्ये सेलिनाची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. तिची मैत्रीण फ्रान्सिया रेसियाने तिला किडनी दिली होती. या आजारपणामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने गायन, अभिनय सगळे काही सोडून दिले होते. ती या सगळ्यातून बाहेर पडेल असे तिला वाटलेच नव्हते. तिने मुलाखतीत देखील सांगितले होते की, मी या आजारपणातून कधी बाहेर पडेन असे मला वाटले नव्हते. पण माझ्या लाडक्या मैत्रिणीने मला किडनी दिली आणि तिच्यामुळेच मी या आजारपणातून बाहेर पडले.

टॅग्स :रणवीर सिंग