Join us  

असली हिप हॉप...! पाहा, रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली बॉय’चा टीजर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 11:32 AM

‘पद्मावत’ या चित्रपटाने रणवीर सिंगने २०१८ वर्षांची धमाकेदार सुरुवात केली होती. २०१९ ची त्याची सुरुवातही तितकीच धमाकेदार झाली. रणवीरचा ‘सिम्बा’ नववर्षांत धूम करतोय. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’पाठोपाठ रणवीरचा ‘गली बॉय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

ठळक मुद्देगली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. टीजरमध्ये त्याची ही मेहनत स्पष्ट दिसतेय.

‘पद्मावत’ या चित्रपटाने रणवीर सिंगने २०१८ वर्षांची धमाकेदार सुरुवात केली होती. २०१९ ची त्याची सुरुवातही तितकीच धमाकेदार झाली. रणवीरचा ‘सिम्बा’ नववर्षांत बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’पाठोपाठ रणवीरचा ‘गली बॉय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. रणवीरचे चाहते त्याच्या या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. काल-परवा चाहत्यांनी ‘गली बॉय’चा फर्स्ट लूक पाहिला. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे.काही तासांपूर्वी रिलीज झालेल्या या टीजरची सुरुवातीलाच मुंबईच्या धारावीचे दर्शन होते. टीजरमध्ये रणवीर रॅप करताना दिसतोय. खास म्हणजे, हे रॅप स्वत: रणवीरने लिहिले आहे. त्याचे हे रॅप ऐकणे, पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग आहे.

‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. टीजरमध्ये त्याची ही मेहनत स्पष्ट दिसतेय. केवळ रणवीरचं नाही तर टीजरमध्ये आलिया भट्ट व कल्की कोच्लिनची झलकही पाहायला मिळतेय. झोया अख्तरच्या या चित्रपटात रणवीर, आलिया व कल्की या दमदार स्टार्सनी अगदी जीव ओतलाय, हे स्पष्ट आहे.

‘गली बॉय’चा टीजर शेअर करताना ‘असली हिप हॉप’ असे रणवीरने आपल्या सोशल अकाऊंटवर लिहिलेय. हे ‘असली हिप हॉप’ किती खास आहे, ते तुम्हीही पाहा आणि कसे वाटले, तेही सांगा...

येत्या ९ जानेवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. १४ फेबु्रवारीला म्हणजेचं व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :रणवीर सिंगआलिया भटकल्की कोचलीन