रणवीर सिंग आणि आलिया भट दिसणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 15:00 IST
बॉलीवुडचे तगडे दोन कलाकार रणवीर सिंग आणि आलिया भट हे एकत्र झळकणार आहेत या दोघांचे ही फॅन्स फॉलोविंग जबरदस्त ...
रणवीर सिंग आणि आलिया भट दिसणार एकत्र
बॉलीवुडचे तगडे दोन कलाकार रणवीर सिंग आणि आलिया भट हे एकत्र झळकणार आहेत या दोघांचे ही फॅन्स फॉलोविंग जबरदस्त आहे. या दोघांच्या चाहत्यांसाठी दिग्दर्शक झोया अख्तर खूशखबर घेऊन येणार आहे. या दोघांना एकत्रित झळकविणार आहे. दिग्दर्शक झोया खान. मागच्याच वर्षी झोयानं रणवीरसोबत 'दिल धडकने दो' हा चित्रपट केला होता. आणि आता पुन्हा झोया रणवीर आणि आलियाला घेऊन नवा चित्रपट करणार असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटासाठी रणवीरनं होकार दिला असल्याचंही बोललं जात आहेत. रणवीर सिंग सध्या आदित्य चोप्राच्या 'बेफिक्रे'च्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतरच झोया अख्तरच्या नव्या चित्रपटाचं शूटिंग सुरु होईल.