Join us

रणवीर-दीपिका अज्ञात स्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:19 IST

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्यासाठी आगामी वर्ष हे अत्यंत आनंददायी असणार असे म्हटले जात आहे. बाजीराव मस्तानीला मिळणारा ...

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्यासाठी आगामी वर्ष हे अत्यंत आनंददायी असणार असे म्हटले जात आहे. बाजीराव मस्तानीला मिळणारा प्रतिसाद पाहता हे वर्षही त्यांच्यासाठी खुप प्रेरणादायी आणि चाहत्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळवणारे होते.दीपिकाने तिचे दोन्ही बॉयफ्रेंड्स सोबत 'तमाशा' आणि 'बाजीराव मस्तानी' हे चित्रपट साकारले. ती या दोन्ही चित्रपटांमुळे खुपच बिझी होती. प्रमोशनल अँक्टिव्हिटीज आणि इंटरव्ह्यूज यांच्यामुळे ती खूपच त्रासली होती. त्यामुळे तिला आता थोडा आराम हवा आहे.ती आता एका अज्ञात स्थळी हॉलीडे प्लॅनिंग करत आहे. अर्थात न्यू ईअरचे प्लॅनिंग त्यात असणारच आहे. रणवीर-डिप्पी तुम्ही कितीही अज्ञात स्थळ शोधा, पण आम्ही तुम्हाला शोधूनच काढू.(फोटो : बॉलीवूड मंत्रा)