Join us

रणवीरचा अमिताभजींना ट्रीब्युट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 10:48 IST

          बॉलीवुडचे शहनशांह अमिताभ बच्चन यांचे तर सगळेच दिवाने आहेत. मग यामध्ये सिताºयांपासुन ते त्यांच्या ...

          बॉलीवुडचे शहनशांह अमिताभ बच्चन यांचे तर सगळेच दिवाने आहेत. मग यामध्ये सिताºयांपासुन ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वचजण बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. असाच एक बॉलीवुडचा चॉकलेट बॉय रणवीर सिंग अमिताभ बच्चन यांचा दिवाना आहे. रणवीरने नूकताच एका पुरस्कार सोहळ््यात अमिताभजींना त्यांच्या गाण्यांवर नृत्य करुन ट्रीब्युट दिला आहे. बॉलीवुडच्या या शहनशांहला त्यांच्याच गाण्यांवर त्यांच्या समोर ट्रीब्युट द्यायचा म्हणजे रणावीरसाठी खरच खुप मोठी गोष्ट होती.                रणवीर सिंग या ट्रीब्युट साठी जाम एक्सायटेड अन खुष दिसत होता. थ्रील टू बी पेईंग टॅीब्युट टू द श्री ग्रेटनेस अमिताभ बच्चन या शब्दांमध्ये रणवीरने त्याच्या भानवा मांडल्या. ब्लॅक लेदर जॅकेट, गळ््यात लाल मफलर अशा वेषात रणवीर अमिताभजींना फॉलो करत होता. अमिताभ बच्चन रणवीरला चीअर अप करण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर याने चक्क बच्चनजींचे पायच धरले. एवढे मोठे सुपरस्टार समोर आल्यानंतर रणवीर तरी काय करणार म्हणा. अमिताभजींना समोर पाहुन रणवीरच्या चेहºयावरील आनंद साफ दिसत होता. या दोघांचीही ही सुपर मोमेंट सगळ््यांनीच नजरेत कैद करुन ठेवली.