Join us  

राणू मंडलचे आहे बॉलिवूडसोबत जुने कनेक्शन, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 2:52 PM

राणूचे बॉलिवूडसोबत खूपच जुने कनेक्शन असल्याचे तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे.

ठळक मुद्देराणू अनेक वर्षांपूर्वी फिरोज खान यांच्या घरात काम करत होती. त्याच्या घरात ती जेवण बनवण्याचे आणि साफसफाईचे काम करत असे. तसेच तिने देखील एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. 

रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजाने देशभरात लोकप्रिय झाली. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. राणू मंडल स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नामक व्यक्तीने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला हिमेश रेशमियाने आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यानंतर आता राणूने पहिल्यांदाच स्टेज परफॉर्मन्स केला आहे. तिने तिच्या सुरेल आवाजाने सभागृहातील रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तसेच नुकताच राणूचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

राणूबद्दल एक खास गोष्ट सध्या मीडियात ऐकायला मिळत आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राणूचे बॉलिवूडसोबत खूपच जुने कनेक्शन आहे. तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसला असेल. पण त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, राणू अनेक वर्षांपूर्वी फिरोज खान यांच्या घरात काम करत होती. त्याच्या घरात ती जेवण बनवण्याचे आणि साफसफाईचे काम करत असे. तसेच तिने देखील एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. 

पत्रिका या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, रानूने एका मुलाखतीत सांगितले आहे की, ती अनेक वर्षं फिरोज खान यांच्याकडे राहिली आहे. तिचे पती फिरोज यांच्याकडे काम करत असत. नवऱ्याला कामात मदत करण्यासाठी ती देखील फिरोज यांच्या घरी घरकाम करायला जात असे. अनेकवेळा ती काम करताना गाणे गुणगुणत असे. तिचा आवाज ऐकून फिरोज यांनी देखील तिच्या आवाजाचे कौतुक केले होते. फिरोज खूप चांगले व्यक्ती होते. ते नेहमीच सगळ्यांना मदत करायचे. राणू मुंबईत राहात असताना फिरोज यांनी राणू आणि तिच्या नवऱ्याची खूप मदत केली होती. राणू बंगाली असल्याने तिच्या बोलण्यात ती ढब नेहमीच येते. राणूचे हिंदी सुधारण्यासाठी देखील फिरोज यांनी तिला मदत केली होती. 

टॅग्स :राणू मंडलफिरोज खान