Join us

RANGOON: विंटेज कारमध्ये एअरपोर्टवर पोहोचली कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 11:01 IST

कंगना राणौतने सध्या ‘रंगून’ चित्रपटातील तिच्या भूमिकेला जरा जास्तच ‘सिरीयस’ घेतले असे दिसतेय. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कथेवर आधारित या ...

कंगना राणौतने सध्या ‘रंगून’ चित्रपटातील तिच्या भूमिकेला जरा जास्तच ‘सिरीयस’ घेतले असे दिसतेय. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कथेवर आधारित या चित्रपटात शाहीद कपूर आणि सैफ अली खानसोबत रोमान्स करणारी कंगना एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे.त्या काळाचा ‘फिल’ येण्यासाठी सिनेमात तुम्हाला अनेक प्रकारच्या विंटेज कार दिसतील. बरं केवळ चित्रपटातच नाही तर त्याच्या प्रोमोशनमध्येही या विंटेज कार दिसणार आहेत. एका रिपोर्टनुसार, ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रत्येक प्रोमोनशनल कार्यक्रमांना कंगना विंटेज कारमधून हजेरी लावणार आहे.नुकतीच ती मुंबई विमानतळावरदेखील विंटेज कारमधूनच गेली होती. डॉर्क मरून रंगाच्या विटेंज कारमध्ये आलेल्या कंगनाने यावेळी पिवळसर केशरी रंगाचा कोट व त्याला मॅचिंग हँडबॅग व गॉगल घातलेला होता. अशा ‘चिक लूक’मध्ये ती एखाद्या रॉयल फॅमिलीची सदस्य वाटत होती.                                                                                                         या चित्रपटात तिची भूमिका ‘फिअरलेस नादिया’वर आधारित असणार आहे. कंगना आणि शाहीदचे अनेक रोमॅण्टिक सीन्सदेखील आहेत. ट्रेलरवरून तरी आधी सैफच्या प्रेमात असलेली कंगना नंतर आर्मी मॅन शाहीदच्या प्रेमात आकांत बुडून जाते. दिग्दर्शक विशाला भारद्वाज यांचा हा महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. त्यामुळे तो चर्चेत राहण्यासाठी ते कोणीतीच रिस्क घेऊ इच्छित नाही.वादग्रस्त आणि दिलखुलासपणे वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंगनाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, ‘सशक्त आणि स्वावलंबी महिलांची पुरुषांच्या लेखी काहीच किंमत नाही. त्यांना नेहमीच कमजोर आणि अबला महिलांवर अधिराज्य गाजवायला आवडते. आपली मते परखडेपण मांडणाऱ्या महिलांची त्यांना भीती वाटते. सुदैवाने सगळेच पुरुष असे नसतात.’