Join us  

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात झाली रणदीप हुड्डाची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:50 PM

संजय लीला भन्साळी लवकरच ‘इंशाअल्लाह’ या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहेत. सलमान खान व आलिया भट यांच्या हातातील प्रोजेक्ट संपताच ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुुरू होईल. पण तत्पूर्वी भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसचा आणखी एक सिनेमा मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देरणदीप हुड्डा एक उत्तम अभिनेता आहे. यापूर्वी बागी 2, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, किक अशा चित्रपटात तो पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसला होता.

संजय लीला भन्साळी लवकरच ‘इंशाअल्लाह’ या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहेत. सलमान खान व आलिया भट यांच्या हातातील प्रोजेक्ट संपताच ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुुरू होईल. पण तत्पूर्वी भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसचा आणखी एक सिनेमा मार्गी लागला आहे. होय, ‘इंशाअल्लाह’सोबत भन्साळी आपल्या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहेत. यापैकीच एका थ्रीलर चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डाची एन्ट्री झालीय. या चित्रपटात रणदीप एका पोलिस अधिका-याची भूमिका साकारताना दिसेल.

बलविंदर सिंग जंजुआ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. याआधी त्यांनी मुबारकां, फिरंगी आणि सांड की आंख यासारख्या चित्रपटांची पटकथा लिहिली. आता बलविंदर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यांनी अनेक दिवसांपासून या स्क्रिप्टवर काम चालवले होते. सूत्रांचे मानाल तर, हा चित्रपट एका छोट्या गावाची कथा पाहायला मिळणार आहे. कथेत अनेक टिष्ट्वस्ट अ‍ॅण्ड टर्नही पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. लवकरच त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे.

रणदीप हुड्डा एक उत्तम अभिनेता आहे. यापूर्वी बागी 2, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, किक अशा चित्रपटात तो पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसला होता. पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत रणदीप अगदी फिट बसतो आणि त्याचमुळे बलविंदर आणि भन्साळींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी त्याची निवड केलीय. तूर्तास रणदीप कार्तिक आर्यन व सारा अली खान स्टारर ‘लव आजकल 2’ या चित्रपटात बिझी आहे. इम्तियाज अली हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.

टॅग्स :रणदीप हुडासंजय लीला भन्साळी