Join us  

काय सांगता? तीन वर्षे लॉकडाऊनमध्ये होता रणदीप हुड्डा; विश्वास बसत नसेल तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 4:37 PM

तीन वर्षे रणदीप म्हणे लॉकडाऊनमध्ये होता. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. 

ठळक मुद्दे अभिनयात येण्यापूर्वी रणदीपने ड्रायव्हर, वेटरचेही काम केले. मेलबर्नमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना एका चायनीज रेस्तरॉमध्ये रणदीपने वेटर होता.

‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता रणदीप हुड्डा बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. फार कमी काळात रणदीपने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 2001 मध्ये मीरा नायर यांच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर 2005 मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही. हाच रणदीप सध्या त्याच्या ‘एक्सट्रेक्शन’ या नेटफ्लिक्स ओरिजनल फिल्ममुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीप हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थसोबत अ‍ॅक्शन करताना दिसला. पण त्याआधी काय? तर त्याआधी तीन वर्षे रणदीप म्हणे लॉकडाऊनमध्ये होता. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. आम्ही नाही तर खुद्द रणदीपने ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

अलीकडे रणदीप ‘लव्ह आज कल’मध्ये झळकला. पण त्याआधी तीन वर्षे त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. कुणी त्याला काम देत नव्हते. त्याने सांगितले, ‘2016 मध्ये मी ‘सबरजीत’ हा सिनेमा केला. त्यानंतर तीन वर्षे मी बेकार होतो. माझ्याकडे काहीच काम नव्हते. मला काम हवे होते. पण कोणीच मला काम देत नव्हते. अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केल्यानंतरही  तीन वर्ष कामाशिवाय काढणे हा अनुभव कसा असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता. ते तीन वर्ष माझ्यासाठी लॉकडाउनसारखेच होते. या तीन वर्षांमध्ये मी खरोखरच लॉकडाउनमध्येच होतो. याचदरम्यान मी नेटफ्लिक्सच्या एका शोसाठी ऑडिशन दिले होते. पण तिथेही मी रिजेक्ट झालो. पण त्याच ऑडिशनमुळे मला ‘एक्सट्रेक्शन’सारखा चित्रपट मिळाला.’

 अभिनयात येण्यापूर्वी रणदीपने ड्रायव्हर, वेटरचेही काम केले. मेलबर्नमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना एका चायनीज रेस्तरॉमध्ये रणदीपने वेटर होता. या काळात कार वॉशिंगचेही काम त्याने केले. दोन वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले.

२००० मध्ये रणदीप भारतात परतला, तो अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊनच. भारतात रणदीपने प्रायव्हेट एयरलाइनमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम केले आणि सोबतच मॉडलिंगही सुरु केले. मॉडेलिंग करता करता अभिनेता बनण्यासाठी तो संघर्ष करत राहिला.

टॅग्स :रणदीप हुडा