Join us

'तमाशा' बाबत रणबीर अंडर प्रेशर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 09:36 IST

र णबीर सध्या त्याच्या करिअरच्या खुपच कठीण काळातून जात आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तमाशा' च्या यशाबद्दल तो अंडर प्रेशर ...

र णबीर सध्या त्याच्या करिअरच्या खुपच कठीण काळातून जात आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तमाशा' च्या यशाबद्दल तो अंडर प्रेशर आहे. तो म्हणाला,' नक्कीच. माझे मागील तिन्ही चित्रपट 'बेशरम, रॉय, बॉम्बे वेल्वेट' तेवढे यशस्वी झाले नाहीत. प्रेशर तर आहेच कारण आम्ही ते आमच्यासाठी तयार करत नाहीत ना, तर प्रेक्षकांसाठी तयार करतो. चाहत्यांना माझ्यावर विश्‍वास आहे. ते म्हणतात की, रणबीर चांगले चित्रपट करतो. पण ते जेव्हा थिएटरमध्ये येतात. तेव्हा मी जर चांगले परफॉर्म केले नाही तर त्यांच्या पैशांचे चीज होत नाही. ' सावरियाँ मधून त्याने करिअरला सुरूवात केली होती. चित्रपटाविषयी तो म्हणतो की, 'सावरियाँ माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा होता. माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगला चित्रपट तो आहे. बर्फीच्या वेळेस मी जशी अँक्टिंग केली तशीच मी नेहमी करू इच्छितो. मी चांगली अँक्टिंग आणि चित्रपट करू इच्छितो.'