रणबीर म्हणतो,‘कॅटनेही घेतली खुप मेहनत’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 22:38 IST
रणबीर कपूर हा वडीलांचा चित्रपट ‘कपूर अॅण्ड सन्स’ च्या स्क्रिनिंगसाठी नुकताच आला होता.
रणबीर म्हणतो,‘कॅटनेही घेतली खुप मेहनत’
कपूर अॅण्ड सन्स च्या स्क्रिनिंगवेळी रणबीर कपूर आला असता माध्यमांकडून त्याला विचारण्यात आले की, जग्गा जासूसचा फर्स्ट लुक केव्हा येणार आहे? याविषयीचे वृत्त काल आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. पण, तो नेमकं काय म्हणाला, याचा व्हिडीओ आऊट झाला आहे. तो म्हणाला, ‘ पुढील महिन्यात रिलीज होईल. मी या फर्स्ट लुक साठी खुप उत्सुक आहे. अनुराग, कॅटरिना आणि मी चित्रपटावर खुप मेहनत घेतली आहे. पुढील महिन्यात त्याचा फर्स्ट लुक रिलीज होईल. जेव्हा तुम्ही चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर पाहाल तेव्हा तुम्हाला तो आवडेल यात काही शंकाच नाही!’अनुराग बासु आणि रणबीर कपूर यांच्या चित्रपटात अदा शर्मा आणि गोविंदा हे देखील असतील. ही कथा एका किशोरवयीन डिटेक्टिव्हची असून तो त्याच्या हरवलेल्या वडीलांना शोधत असतो.