Join us  

Shamshera Box Office Collection : ‘शमशेरा’नं केली निराशा, 150 कोटींच्या सिनेमानं तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:01 PM

Shamshera Box Office Collection : गेल्या शुक्रवारी 22 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचे आकडे निराशाजनक आहेत. साऊथ बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.

Shamshera Box Office Collection : यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘शमशेरा’कडून  (Shamshera) सर्वांनाच प्रचंड अपेक्षा होत्या. पण गेल्या तीन दिवसांचा ‘शमशेरा’चा बिझनेस बघता, सर्वांचाच अपेक्षाभंग झाल्याचं चित्र आहे.  गेल्या शुक्रवारी 22 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचे आकडे निराशाजनक आहेत.

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor ) ‘शमशेरा’ने पहिल्या दिवशी केवळ 10.25 कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी हा चित्रपट चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा होती. पण ती सुद्धा फोल ठरली. शनिवारी दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ 10.50 कोटींचा गल्ला जमवला. दोन दिवसांत या चित्रपटाने एकूण 20.75 कोटींचं कलेक्शन केलं. रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, अशी अपेक्षा असतानाच, रविवारी या चित्रपटाने 11.50 ते 12.50 कोटींचा बिझनेस केला. तीन दिवसांची एकूण कमाई बघता या चित्रपटाने केवळ 32.75 कोटींची कमाई केली आहे. 150 कोटी रूपये खर्चून बनलेल्या ‘शमशेरा’साठी कमाईचे हे आकडे फार काही समाधानकारक नाहीत.

चित्रपटगृहांत अन्य कोणताही सिनेमा नसताना ‘शमशेरा’ची ही गत पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जबरदस्त प्रमोशन करूनही रणबीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. ‘शमशेरा’च्या ट्रेलरची जोरदार चर्चा होती. चित्रपटातील रणबीरच्या लुकवरही बरीच चर्चा झाली होती. पण चित्रपट प्रदर्शित होताच, प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाठ दाखवली. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द झाल्याचे कळतेय.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘आणखी एक मोठा चित्रपट... अर्थात कहाणी अद्याप संपलेली नाही. काही चित्रपटगृहांत सकाळ आणि दुपारचे ‘शमशेरा’चे शो प्रेक्षकांअभावी रद्द करण्यात आले आहेत,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

रणबीरचं कमबॅक फसलं!!चार वर्षाच्या ब्रेकनंतर रणबीर कपूरनं ‘शमशेरा’द्वारे कमबॅक केलं होतं. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. पण आता त्याचं कमबॅक फसल्याचं मानलं जात आहे.करण मल्होत्राने दिग्दर्शित केलेल्या ‘शमशेरा’मध्ये रणबीर कपूर व वाणी कपूर लीड रोलमध्ये आहेत. यशराज बॅनरचा हा सिनेमा हिंदीशिवाय तामिळ व तेलगू भाषेत रिलीज करण्यात आला आहे.

साऊथमध्येही नो रिस्पॉन्स!!‘शमशेरा’ तामिळ व तेलगू भाषेतही प्रदर्शित झाला आहे. पण साऊथ बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. ‘शमशेरा’च्या तामिळ व्हर्जनने पहिल्या दिवशी केवळ 5 लाखांचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशीही इतकीच कमाई केली. तेलगू व्हर्जनने पहिल्या दिवशी 10 लाखांची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी केवळ 6 लाख कमावले. 

टॅग्स :शमशेरारणबीर कपूर