Join us

रणबीर कपूर नच बलियेमध्ये ही केवळ अफवाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 16:37 IST

नच बलिये 8 या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध जोडपी या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार ...

नच बलिये 8 या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध जोडपी या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपला परफॉर्मन्स इतरांपेक्षा चांगला व्हावा यासाठी हे सगळेच प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते कित्येक तास रिहर्सल करत आहे.या कार्यक्रमाद्वारे सोनाक्षी सिन्हा छोट्या पडद्यावर झळकली आहे. सोनाक्षीने दबंग या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. आज तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्याचेदेखील कौतुक करण्यात येते. ती नच बलिये या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमात सोनाक्षीसोबत रणबीर कपूरदेखील झळकणार असल्याची चर्चा होती. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात रणबीर झळकणार असल्याचे म्हटले जात होते. तो या कार्यक्रमाचा पहिला भाग होस्ट करणार असून या भागात त्याच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकणार असल्याची चर्चा होती. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे त्याने म्हटले आहे. तो नच बलिये काय तर कोणत्याच रिअॅलिटी शोमध्ये सध्या तरी भाग घेणार नसल्याचे त्याने म्हटले आहे.रणबीर कपूर नच बलिये या कार्यक्रमाचा भाग होणार आहे या केवळ अफवा असल्याचे त्याने सांगितले आहे. रणबीरकडून याबाबत सांगण्यात आले आहे की, मी एका रिअॅलिटी शोचा भाग असल्याच्या अफवा कोण पसरवत आहेत हेच आम्हाला कळत नाहीये. मला कधीच कोणत्या रिअॅलिटी शोबाबत विचारण्यात आलेले नाही की कोणत्या रिअॅलिटी शोचा भाग व्हायची माझी इच्छा नाहीये. सध्या मी संजय दत्तच्या आयुष्यावर बनत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरण व्यग्र आहे.