Join us  

 तर जमणार रणबीर कपूर व रणवीर सिंगची ‘तुफानी’ जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 3:38 PM

रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छा बाळगून असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच रणबीर व रणवीर हे दोन सुपरस्टार्स एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील.

ठळक मुद्देरणबीरने रणवीरपेक्षा मोठ्या रकमेची मागणी केली आहे. यातून काही तोडगा निघाला तर रणबीर व रणवीर एकत्र दिसणे शक्य आहे.

रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छा बाळगून असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच रणबीर व रणवीर हे दोन सुपरस्टार्स एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील. पण थांबा...थांबा... आनंदाच्या भरात ही बातमी शेअर करण्यापूर्वी आम्ही पुढची बातमी तुम्हाला सांगू इच्छितो. रणबीर-रणवीर एकत्र येणार, हे तर खरे आहे. पण कुठल्या चित्रपटात नाही तर एका जाहिरातीत.अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण चर्चा खरी मानाल तर, एका शितपेयाच्या ब्रॅण्डने रणबीर-रणवीरला एकत्र आणण्याची तयारी चालवली आहे. या ब्रॅण्डने दोघांशीही संपर्क साधला आहे. अर्थात अद्याप दोघांनीही होकार दिला की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसा रणवीर आधीच या ब्रॅण्डचा अ‍ॅम्बीसीडर आहे. पण आता संबंधित ब्रॅण्ड त्याच्यासोबत गेस्ट रोलमध्ये रणबीरला आणून इच्छितो. यासाठी रणबीरला मोठी रक्कम आॅफर करण्यात आल्याचीही खबर आहे. रणवीर हा दीपिका पादुकोणचा पती आहे आणि रणबीर हा तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड आहे. अशात हे दोघे एकत्र आलेच तर ब्रॅण्डला त्याचा फायदा होईल,असे या शितपेय कंपनी वाटतेय.अन्य काही सूत्रांच्या मते, रणबीरला मोठी रक्कम आॅफर केली गेली असली तरी ती रणवीरपेक्षा कमी आहे. त्यामुळे रणबीरने रणवीरपेक्षा मोठ्या रकमेची मागणी केली आहे. यातून काही तोडगा निघाला तर रणबीर व रणवीर एकत्र दिसणे शक्य आहे. कधी, ते लवकरच कळेल. अर्थात तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.

टॅग्स :रणबीर कपूररणवीर सिंग