Join us  

OMG! बी-टाऊनमध्ये सुरु झाली रणबीर कपूरच्या नव्या BFFची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:23 AM

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. पण आता एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्दे‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होतोय.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. आता तर या कपलच्या लग्नाची तेवढी प्रतीक्षा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. पण आता एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. होय, रणबीर कपूर एकीकडे आलियाच्या प्रेमात असताना दुसरीकडे  सोशियलाईट आणि फॅशनिस्टा नताशा पूनावाला हिच्यासोबतची त्याची वाढती मैत्री चर्चेत आहे. होय, सध्या बी-टाऊनमध्ये रणबीर व नताशाची  वाढती मैत्री गॉसिप्सचा विषय बनली आहे. रणबीर व नताशा बी-टाऊनचे नवे बीएफएफ आहेत.

नताशा ही करिना कपूरची अगदी जवळची मैत्रिण आहे. तिच्यासोबत अनेक पार्ट्यांमध्ये नताशा दिसते. पण स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, आता नताशा करिनासोबतच तिचा चुलत भाऊ रणबीर कपूरसोबत मैत्री वाढवताना दिसतेय. नताशा ही बिलिनिअर आदर पूनावालाची पत्नी आहे.

बॉलिवूडच्या ए-लिस्ट स्टार्सच्या ती सतत संपर्कात असते. असे असताना अचानक तिच्या आणि रणबीर यांच्यात फुलत असलेल्या मैत्रीच्या चर्चा होऊ लागल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो लीक झाले होते. यात आलिया व रणबीर दोघेही वाराणसीच्या घाटावर शूटींग करताना दिसले होते.‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होतोय. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर व आलिया यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :रणबीर कपूर