Join us  

खरच की काय ? आलिया भट व रणबीर कपूरचे झाले ब्रेकअप; अशी आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:13 AM

होय, आलिया व रणबीरमध्ये सर्व काही ‘ऑल वेल’ नसल्याचे कळतेय.

ठळक मुद्देआलियाच्या वाढदिवसाला रणबीर न दिसल्यामुळे एकूणच वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

आलिया भटरणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात आलिया व रणबीरची वर्णी लागली आणि चित्रपटाचे शूटींग सुरु होत नाही तोच ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरून आलिया व रणबीरच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. मध्यंतरी हे दोघे लवकरच लग्न करणार अशीही चर्चा होती. पण सध्या मात्र वेगळीच कुजबुज कानावर येतेय. होय, आलिया व रणबीरमध्ये सर्व काही ‘ऑल वेल’ नसल्याचे कळतेय.

चर्चा खरी मानाल तर अलीकडे रणबीर आलियाशी अतिशय वाईट पद्धतीने वागला. यामुळे दोघांचे ब्रेकअप झााले. अर्थात रणबीर व आलियाच्या जवळच्या लोकांच्या मते, ब्रेकअपच्या या बातम्या खोट्या आहेत. आत्ताही दोघे सोबत आहेत. नुकताच आलियाचा बर्थ डे साजरा झाला. या बर्थ डे सेलिब्रेशनला रणबीर कपूर हजर नव्हता. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

मात्र नंतर रणबीर आलियाला किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. अर्थात हा फोटो आलियाच्या वाढदिवशीचाच होता का, याबद्दल खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आलियाच्या वाढदिवसाला रणबीर न दिसल्यामुळे एकूणच वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

रणबीर कपूर आधी दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण कालांतराने दीपिकाला सोडून रणबीर कतरीना कैफमध्ये गुंतला. मात्र हे नातेही फार काळ टिकले नाही. कतरीनाशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर आलियाच्या प्रेमात पडला. आलियाचे म्हणाल तर रणबीर कपूरआधी ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती.  रणबीर आयुष्यात येण्याआधीच आलियाचे सिद्धार्थसोबत ब्रेकअप झाले होते.  

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर