Join us  

जाणून घ्या कधी रिलीज होणार रणबीर कपूर-आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 3:00 PM

अभिनेता रणबीर कपूरच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचले. या चित्रपटानंतर रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या तयारीत लागला. ‘ब्रह्मास्त्र’ हा तीन भागांत रिलीज होणार आहे.

ठळक मुद्देआज धर्मा प्रॉडक्शनने ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागाची रिलीज डेट जाहिर केली. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

अभिनेता रणबीर कपूरच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचले. या चित्रपटानंतर रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या तयारीत लागला. ‘ब्रह्मास्त्र’ हा तीन भागांत रिलीज होणार आहे. साहजिकचं या चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. आज धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाच्या पहिल्या भागाची रिलीज डेट जाहिर केली. त्यानुसार, याचा पहिला भाग पुढील वर्षी नाताळच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणार आहे.करण जोहरने आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग नाताळ २०१९ मध्ये रिलीज होईल, असे त्याने लिहिले.

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय.) ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबतआलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.    करिअरच्या सुरूवातीला रणबीरने रोमॅन्टिक चित्रपट केलेत. या चित्रपटाने त्याची ‘लव्हरबॉय’ ही इमेज तयार केली. पण आता तो या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करतो आहे. कदाचित म्हणूनचं रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘समशेरा’ सारखे चित्रपट साईन केले आहेत. या आगामी चित्रपटांत रणबीरचा अ‍ॅक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटकरण जोहर