Join us

रणबीर-दीपिका चांगले कलाकार - शाहरूख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:21 IST

आ गामी चित्रपट 'तमाशा' च्या प्रमोशनसाठी रणबीर-दीपिका गेले असता त्यांनी शाहरूख आणि काजोल या जोडीच्या केमिस्ट्रीची डबिंग केली. प्रतिक्रियेसाठी ...

आ गामी चित्रपट 'तमाशा' च्या प्रमोशनसाठी रणबीर-दीपिका गेले असता त्यांनी शाहरूख आणि काजोल या जोडीच्या केमिस्ट्रीची डबिंग केली. प्रतिक्रियेसाठी शाहरूखला विचारले असता तो म्हणाला,' मी सौम्य दिसतो पण, मी नाही. आम्ही दोघेही विवाहित आहोत. त्यामुळे आमच्याबद्दल असे बोलू नका. रणबीर-दीपिका हे खुपच सुंदर माणसं आहेत. ते उत्तम सहकलाकारही आहेत. त्यांनी आमच्याविषयी काय बोलले आहे ते मी वाचले आहे. ' शाहरूख-काजोल यांचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपट १९९५ मध्ये रिलीज झाला. आता दिलवाले मधुन शाहरूख-काजोल ही जोडी कमबॅक करत आहे. 'आम्ही बॉलीवूड इंडस्ट्रीत जवळपास २0 वर्षांपासून आहोत. आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. केमिस्ट्री उत्तम व्हावी एवढय़ाचसाठी आम्ही करत नव्हतो. तर प्रेक्षकांना समाधान वाटावे हे लक्षात घेऊन आम्ही काम करायचो.