Join us  

लॉकडाऊनमध्येच बाहुबली फेम राण्णा दुग्गबतीने उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 12:12 PM

राणाची होणारीी पत्नी इंटेरिअर डिझायनर आहे.

राण्णा दुग्गबतीने प्रियसी मिहिका बजाजसोबत साखरपुडा केला आहे. राण्णाने स्वत: इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गुडन्युज आपल्या चाहत्यांना दिली आहे. फोटो शेअर करताना त्यांने, And it’s official!!  असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. राण्णाचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. राण्णा आणि मिहिकावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय. 

काही दिवसांपूर्वीच राणाने मिहिकासोबतचा फोटो शेअर करत, आणि तिने होकार दिला असे लिहिले होते. मिहिका बजाज असून ती इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. तिची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर असून क्रासाला हा त्यांचा ब्रँड प्रसिद्ध आहे.

बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.

राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू हे प्रसिद्ध निर्माते असून हैदराबादमध्ये त्यांचा रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते निर्माते दग्गुबाती रामानायडू यांचे पूत्र आहेत. त्यांनी सुरेश प्रॉडक्शनची सुरूवात केली होती. या प्रॉडक्शन हाऊसचे आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये काही थिएटरही आहेत.

टॅग्स :राणा दग्गुबती