Join us  

‘या’ बायोपिकमध्ये दिसणार रामायणातील सीता माँ, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 12:16 PM

माता सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया पुन्हा एकदा चर्चेत...

ठळक मुद्देदीपिका यांनी कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केले. 

८० च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही मालिका पुन्हा प्रसारित होत आहे. यानिमित्ताने या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, होय, लवकरच टीव्हीची ही सीता सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. होय, खुद्द दीपिका यांनी ‘इंडिया टुडे’ला ही माहिती दिली.  सरोजिनी नायडू यांचे बायोपिक ऑफर झाल्याचे त्यांनी सांगितले.

दीपिका यांनी सांगितले,‘काही दिवसांपूर्वी सरोजिनी नायडू यांचे बायोपिक मला ऑफर झालेय. अर्थात अद्याप मी हा सिनेमा साईन केलेला नाही. धीरज मिश्रा यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली असून तेच हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. पण लॉकडाऊनमुळे धीरजने मला अद्याप स्क्रिप्ट ऐकवली नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थिती पुर्ववत झाल्यानंतर हा चित्रपट करायचा की नाही, याचा निर्णय मी घेईल.’‘मी स्वत: सरोजिनी नायडू यांच्याबद्दल बरेच संशोधन केले. पण मला फार काही माहिती मिळाली नाही. ऑनलाईन फार काही उपलब्ध नाही. पण ही भूमिका ऑफर झाल्याने मी आनंदी आहे. स्टोरी सेशननंतर सगळे काही ठीक राहिले तर हा चित्रपट करताना मला आनंदच होईल. कारण याआधी मी बायोपिक केलेले नाही,’असेही दीपिका म्हणाल्या.

दीपिका यांनी ‘रामायण’ मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. भगवान दादा, रात के अंधेर में, खुदाई, सुन मेरी लैला, चीख, आशा ओ भालोबाशा (बंगाली) आणि नांगल (तामिळ) या सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. ‘रामायण’नंतर त्यांनी  ‘विक्रम वेताळ’, ‘लव कुश’ या मालिकांमध्येही काम केले. ‘रामायण’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत त्यांनी 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. पण काही वर्षांनी राजकारणालाही रामराम ठोकला.

दीपिका यांनी कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केले. त्यांना निधी व जुही अशा दोन मुली आहेत. सध्या दीपिका पतीचा बिझनेस सांभाळतात. पतीच्या कंपनीच्या रिसर्च व मार्केटींग टीमच्या त्या हेड आहेत.

टॅग्स :रामायण