Join us  

संजूचा खरा बायोपिक करणार रामगोपाल वर्मा, 'या' चार महिलांना देणार न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 11:03 AM

राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर सत्य लपवण्याचे आरोपही लावले आहेत. आता रामगोपाल वर्मा संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढून सत्य समोर आणणार असल्याची चर्चा होत आहे. 

(Image Credit: MidDay)

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या 'संजू' या बयोपिकमधून पूर्ण सत्य दाखवण्यात आलं नसल्याचा आरोप दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केला आहे. राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर सत्य लपवण्याचे आरोपही लावले आहेत. आता रामगोपाल वर्मा संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढून सत्य समोर आणणार असल्याची चर्चा होत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, राम गोपाल वर्मा यांना वाटतंय की, 'राजकुमार हिरानी यांनी संजय दत्तची केवळ चांगली बाजू समोर आणली आहे. बाबाला परिस्थितीचा पीडित दाखवलं गेलं आहे. असे दाखवण्यात आले आहे की, जसे बाबाला हे माहीतच नव्हते की, काय होतंय. हिरानीने तेच दाखवलं जे संजूला दाखवायचं होतं'.

मुंबई बॉम्ब ब्लास्टप्रकरणाची जेव्हा संजय दत्तची चौकशी सुरु होती तेव्हा राम गोपाल वर्मा 'दौड' सिनेमाची शूटिंग करत होते. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रामू आपल्या सिनेमातून संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्यालाही स्पष्टपणे दाखवणार आहे. संजयच्या जीवनातील चार महिला

मीडिया रिपोर्टनुसार, रामू यामुळे नाराज आहे की, राजकुमार हिरानी यांनी बायोपिकमध्ये टीना मुनीम, माधुरी दीक्षित, ऋचा शर्मा आणि रिया पिल्लई यांसारख्या संजयच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्तींना कसा विसरू शकतो. आता अशी चर्चा आहे की, रामू आपल्या सिनेमातून या चारही माहिलांची बाजू दाखवणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, रामू या वर्षांच्या शेवटी सिनेमाचं शूटिंग सुरु करू शकतात. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजयच्या भूमिकेसाठी रामू यांची पहिली पसंत साऊथ सिनेमातील स्टार राणा दग्गुबाती हा आहे. पण याबाबत आजून काहीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.

टॅग्स :राम गोपाल वर्मासंजय दत्तजैव विविधता दिवसबॉलिवूड